महिला सक्षामिकरणाच्या दिशेने केवळ विचार न मांडता त्याला आपल्या अनुभवाच्या आधारे त्रिमित रचना “हर हाईनेस्ट” या फक्त स्त्रियांसाठी असलेल्या गृहप्रकल्पाचे उद्घाटन सोहळा १९ जुलै २०१९ रोजी वीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे ३५० महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमात भारतीय चित्रपट निर्मात्या अश्विनी सिधवानी, त्रिमित रचनाच्या सर्वेसर्वा प्रज्ञा पोंक्षे प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी तसेच माईक ग्लोवर ( सल्लागार – त्रिमित रचना ) प्रकाश राव (श्री स्वामी समर्थ डेवलपर्स) मान्यवर उपस्थित होते.
या योजनेचे नेमके स्वरूप स्पष्ट करताना त्रिमित रचनेच्या सर्वेसर्वा प्रज्ञा पोंक्षे, म्हणाल्या, “हर हाईनेस्ट ही संकल्पना फक्त स्त्रियांसाठी आखली आहे. या प्रकल्पातून पुढच्या १० वर्षात १००० महिलांना घर देण्याची शाश्वती दिली आहे. खास म्हणजे वीर सैनिक महिलांना विशेष सबसिडी देण्यात येईल. महिला स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण करून जीवन बदलण्याचा प्रयत्न करतील. म्हणून आम्ही महिलांना सुरक्षित आणि परवडण्याजोगे घरांचा पर्याय उपलब्ध करुन देणार आहोत. स्त्रियांना सशक्त करणे, त्यांच्यासाठी स्वतःचे घर असणे, याद्वारे त्यांची स्वतःची ओळख तयार करण्यामागे उद्देश आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाली,” ह्या कार्यक्रमाचा मुहूर्त म्हणजेच स्त्रीला आत्मसन्मान देण्याची वृत्ती व ही वृत्ती वाढीला लागावी यासाठी “हर हाईनेस्ट” ही संकल्पना मांडली आहे.स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना समान मानण आणि ते कागदोपत्रीही असण गरजेचे आहे. तसेच स्त्रीचा आत्मप्रतिष्टा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. हीच बाब लक्ष्यात घेऊन ही खूपचं सुंदर कलप्ना प्रत्यशरुपात यांनी मांडली आहे आणि ही कल्पना फार दूरपर्यंत प्रज्ञा नक्की नेतील”.
या कार्यक्रमात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण, स्वातंत्र्य आणि स्वतःची ओळख या विषयावर पॅनेल चर्चासत्र झाले. स्त्रीचं खरं घर कोणतं ? माहेर कि सासर की स्वतःच याचा ठाव घेणारा ‘वेलकम होम’ ह्या मराठी सिनेमाचं “विशेष स्क्रीनिंग” खास महिलांसाठी आयोजित केल होत.