सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये सिद्धार्थच्या अपघाताने मालिकेला नवे वळण आणले आहे. सिद्धार्थच्या अपघातानंतर दुर्गा थेट अनुच्या घरी पोहचली आणि तिने अनुसमोर सिद्धार्थचा जीव वाचवावा म्हणून मदत मागितली… अनु सिद्धार्थला भेटण्यास तयार झाली, आणि सगळे चित्र बदलले. अनुने सिद्धार्थसोबत लग्न करण्यास होकार दिला आहे…  सिद्धार्थच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधार होत आहे… मालिकेमध्ये लवकरच सिद्धार्थ आणि अनुचा विवाह सोहळा बघायला मिळणार असून त्याची तयारी आता सुरु झाली आहे … अनुच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेंदी रंगणार आहे.

खूप दिवसांपासून प्रेक्षक या दिवसाची वाट बघत होते आणि त्या प्रवासाची आता सुरुवात झाली आहे. तुम्हीही व्हा, या सोहळ्याचा भाग. मेंदीच्या फोटोज मध्ये मृणाल म्हणजेच अनु खूपच सुंदर दिसत आहे…

सिद्धार्थ आणि अनुचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे, आणि आता हे दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत… अनु आणि सिद्धार्थचे लग्न  निर्विघ्नपणे पार पडेल ? हे बघणे रंजक असणार आहे…

तेंव्हा नक्की बघा सुखाच्या सरींनी हे मन बावरे विवाह सोहळा रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.