एखाद्या खास व्यक्तीला भेटण्यासाठी किंवा कार्यक्रमाला जात असताना अचानक तुमच्या कपड्यांवर खांद्यावर पांढरे कण दिसल्याने तुम्हाला ही खूप लाजिरवाणे वाटते का? तुम्हीदेखील कोंड्यामुळे सतत होणाऱ्या खाजेने त्रस्त असाल तर नक्की करून पहा हे उपाय.
कोंडा ही एक डोक्यावर आढळणारी समस्या आहे जी मलासीसीया नावाच्या बुरशीमुळे उद्भवते. ही बुरशी सिबम नावाच्या ग्रंथींवर वाढते आणि फॅटी ऍसिड तयार करते तेव्हा डोक्याला खाज येते. फॅटी ऍसिडमुळे होणाऱ्या खाजेवरून कोंड्याची तीव्रता लक्षात घेता येते.
कोंड्यावर आपल्याला माहित नसलेले काही नैसर्गिक उपाय
व्हिनेगर आणि ऑलिव्ह ऑइल – व्हिनेगर खाज सुटणे, कोरडी त्वचा ह्यावर उपचार करण्यात मदत करते तसेच कोंडा निर्माण करणारी बुरशी आणि जीवाणू नष्ट करण्यास देखील मदत करते. व्हिनेगरमधील आम्लीय घटक फ्लाकिंग कमी करण्यास अत्यंत फायदेशीर ठरते.
कोंडासाठी ऑलिव तेल हे एक नैसर्गिक कंडीशनर आहे. ह्यात असणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करण्यास मदत करतात. वजनाला हलके असलेले हे तेल केसांवर प्रभावी आहे. कसे वापराल एका भांड्यात 1 टीस्पून ऑलिव्ह ऑईल आणि 2 टीस्पून पांढरा व्हिनेगर मिक्स करावे. हे मिश्रण कोंडा असलेल्या भागावर लावा आणि टाळूवर पाच मिनिटे मालिश करा. नंतर सल्फेट-फ्री अँटी-डँड्रफ शैम्पूने धुवून घ्या.
बेकिंग सोडा बेकिंग सोडा स्क्रब म्हणून फायदेशीर ठरतो. खाज निर्माण न करता आणि मृतपेशी काढून न टाकता कोंडा काढून टाकण्यास मदत करतो.
कडुलिंब पूर्वीपासून वापरात असलेल्या कडुलिंबाचे गुणधर्म आपण सर्वच जाणतो. ह्यात असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण कोंडाच नाहीतर चेहऱ्याच्या त्वचेसाठी देखील उपयुक्त ठरतात. कडुलिंबाची पाने गरम पाण्यात उकळून किंवा पानांचा रस काढून त्यात पाणी टाकून हे मिश्रण डोक्याला लावावे. नंतर कोमट पाण्याने केस धुवून घ्यावे.
लसूण अँटीफंगल गुणांनी भरपूर असणारा लसूण अत्यंत फायदेशीर ठरतो. दोन पाकळ्या लसूण बारीक वाटून पाण्यात मिसळून डोक्याला लावावा.उग्र वास टाळण्यासाठी थोडासा मध मिश्रणात घालावा.
कोरफड – अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असलेली कोरफड कोंड्यासोबत डोक्याची खाज कमी करण्यास मदत करते. कोरफडीचा गर डोक्याला लावून साधारण 20-30 मिनिटांनी पाण्याने धुवून टाकावा.
दही – ह्यात असलेले लॅक्टिक ऍसिड कोंडा कमी करण्यास मदत करते तसेच ह्यातील प्रोटिन्स केसांना मुळापासून मजबूत करण्यास मदत करतात.
कसे वापराल- कोमट पाण्याने केस धुवून ते कोरडे करावे. टाळू आणि डोक्यावर दह्याचा लेप लावून 10 मिनिटे ठेवावे. नंतर पाण्याने केस धुवावे.
-भक्ती संदिप
(Microbiologist in Foodvibes Grocers)
टीप : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित आहे, त्यामुळे त्यातील मतांशी ‘starmarathi.in’ चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्ला-मसलत करणे आवश्यक आहे
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.