सिनेसृष्टीत अनेक स्टार्स आणि सुपरस्टार्स यांची मुलं नेहमीच पाऊल ठेवत असतात. त्यांच्यापैकी अनेक जण प्रचंड यशस्वी होतात. दबंग 3 या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर हिने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले आहे. सध्या सोशल मीडियावरती सई मांजरेकर चांगलीच चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर सईने पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल होत आहेत.

यामुळे तिचे चहातेदेखील खुश आहेत आणि तिच्या चाहत्यांकडून त्या पोस्ट वरती लाईक आणि कमेंट पाऊस पडतो आहे. नुकताच सईने नऊवारी साडीतील फोटो इंस्टाग्राम वरती पोस्ट केला होता. या फोटो मधील तिचा अस्सल मराठमोळा लुक पाहून तिचे चहातेच काय सेलिब्रिटी देखील घायाळ झालेले आहेत.

नऊवारी साडी, नथ, चंद्रकोर टिकली आणि उठावदार झुमके असा पारंपरिक वेश तिने केला होता. कदाचित लग्नात जाण्यासाठी सईने ही पारंपारिक वेशभूषा केलेली असावी. या फोटो सोबतच सईने तिच्या आईसोबतचा देखील फोटो पोस्ट केलेला आहे.

या फोटोमध्ये मेधा मांजरेकर देखील पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेमध्ये दिसत आहे. या फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंट केलेल्या आहेत. त्यासोबतच या फोटोंवर अभिनेत्री अमृता खानविलकर क्रांती रेडकर या सेलिब्रिटींनी देखील कमेंट केल्या आहेत.

सईने पहिल्याच चित्रपटातून तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे. दबंग 3 मध्ये तिने सलमानच्या प्रेयसीची भूमिका खूप छान पद्धतीने साकारली आहे. या चित्रपटाला परीक्षकांकडून आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद जरी मिळत असला तरीही सईच्या अभिनयाची मात्र प्रत्येक जण तारीफ करत होतं.

तिच्या या अभिनयाच्या कौशल्याची सर्वत्र चर्चा झाली. आयफा या प्रसिद्ध पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सई सलमान सोबत दिसली होती. त्यामुळे सर्वांच्या नजरा तिच्यावर ती खीळल्या होत्या.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.