हिवाळ्यात बाजारात हिरव्या वाटण्याच्या शेंगा हमखास पाहायला मिळतात. खाण्याच्या विविध पदार्थात रंगत आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाटण्यांमध्ये अनेक पोषकद्रव्ये आढळतात. तसेच आरोग्यदृष्ट्या वेगवेगळ्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी वाटण्याचा आहारात नियमित समावेश केल्याने चांगला उपयोग होतो. पण हिरवे वाटाणे ज्याप्रमाणे आपल्यासाठी उपयुक्त आहेत त्यापेक्षा जास्त लाभदायक असणाऱ्या काळ्या वाटाण्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी काळ्या वाटाण्याची उसळ केली जाते. हे वाटाणे प्रोटिन्स, फायबरसह व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा देखील उत्तम स्रोत असतात. फॅटने कमी असलेले हे काळे वाटाणे मॅग्नेशियम, मॉलिब्डेनम सारख्या मिनरल्सने परिपूर्ण असतात.

काळ्या वाटाण्यामध्ये अंथोसायनिन नावाचे रसायन असते. हे रसायन डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदत करते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये दृष्टिदोषाचे प्रमाण अधिक दिसून येते. अशा लोकांसाठी ह्याचे सेवन फायदेशीर ठरते.

काळ्या वाटाण्यांच्या नियमित सेवनाने हृदयाशी संबंधित समस्याही दूर होतात. यातील अँटी-इंफ्लेमेट्री तत्व आणि भरपूर प्रमाणात असलेले अँटी ऑक्सिडेंट हृदयरोगाचा धोका करण्यास मदत करतात.

ह्या वाटाण्यात भरपूर प्रमाणात फायबर आणि फॅट कमी असते. त्यामुळे ह्याच्या सेवनाने शरीराला उर्जा मिळते मात्र चरबी वाढत नाही. शिवाय मधुमेह आणि पाचनक्रियेसाठी देखील उपयुक्त ठरते.

बऱ्याच लोकांना अल्जाइमर नावाचा आजार असतो. काळ्या वाटाण्याच्या नियमित सेवनाने हा आजार बरा होतो. तसेच ऑस्ट्रीयोपोरोसीस आणि ब्रोंकाइटीस अशा समस्या कमी करण्यासाठी देखील मदत होते.

काही संशोधनातून असे देखील सिद्ध झाले आहे की काळे वाटाणे काही प्रकारच्या कॅन्सरवर देखील फायदेशीर आहेत.

-भक्ती संदिप
(Nutritionist in Foodvibes Grocers)

टीप : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित आहे, त्यामुळे त्यातील मतांशी ‘starmarathi.in’ चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्ला-मसलत करणे आवश्यक आहे

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.