Hrudayantar

Upcoming Marathi Movie Hrudayantar (2017) Release date Cast Wiki Actor Actress Photos




Hrithik Roshan’s First Marathi Movie Hrudayantar

Hrithik Roshan To Make A Cameo In Vikram Phadniss Marathi Film

मराठी सिनेमातून हाताळले जाणारे वेगवेगळे विषय आणि त्याला मिळणारं यश यामुळे बॉलिवूड कलाकारही मराठी सिनेमात काम करण्याची उत्सुकता दाखवत आहेत. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन Hrithik Roshan ही त्याला अपवाद राहिलेला नाही. हृतिक सध्या फॅशन डिझायनर विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ Hrudayantar या मराठी सिनेमात काम करत आहे. कौटुंबिक नाते संबंधावर आधारलेल्या या सिनेमाचे चित्रीकरणही सुरू झाले आहे.

 

Hrudayantar Marathi Movie

 

अभिनेता शाहरूख खानच्या Shahrukh Khan हस्ते या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. यावेळी अभिनेता अर्जून कपूरही उपस्थित होता. डिसेंबरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हृतिकची मराठी चित्रपटात काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एका दाम्पत्याची त्यांच्या वैवाहिक जीवनातली वादळांशी असलेली झुंज दाखवणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटाची कथा अत्यंत चांगली आणि आव्हानात्मक असल्याने ती कोणीही नाकारणे शक्यच नव्हते. हृतिकमुळे हा सिनेमा अधिक चांगला होणार असल्याचे विक्रम फडणीस म्हणाले. हृतिकला या चित्रपटाची कथा ऐकवली. वीस मिनिटाची मिटींग झाली आणि त्याने या चित्रपटात काम करण्यास तात्काळ होकार दिला, असंही फडणीस यांनी सांगितलं.