Shur Aamhi Sardar Marathi Movie Released On 21 April




Shur Aamhi Sardar Marathi Movie Songs

Shur Aamhi Sardar Marathi Full Movie Download

 

“शूर आम्ही सरदार” २१ एप्रिलपासून चित्रपटगृहात!!
 
– ऑस्ट्रेलियास्थित निर्माता लेखक गणेश लोके यांचा चित्रपट!!
 
– दहशतवादावर भाष्य करणारा चित्रपट!!
भारताबाहेर राहणाऱ्या मराठीजनांना मराठी चित्रपटाविषयी विशेष प्रेम आहे. त्या प्रेमातूनच निर्मिती, लेखन, अभिनय अशा माध्यमातून काही मराठीजन मराठी चित्रपटाशी जोडले जातात. ऑस्ट्रेलियास्थित गणेश लोके यांनी पुढाकार घेऊन दहशतवादावर आधारित शूर आम्ही सरदार Shur Aamhi Sardar  हा चित्रपट केला आहे. २१ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
दहशवादाविरोधात एकत्र येत आलेले तीन तरूण काय करतात, त्यांना दहशवादाविरोधात काम करण्यात यश येतं का या आशयसूत्रावर हा चित्रपट आधारित आहे. दहशतवादासारखा संवेदनशील विषय मराठी चित्रपटाच बऱ्याच काळानं हाताळण्यात आला आहे. गणेश लोके यांनी या चित्रपटात चौफेर जबाबदारी निभावली आहे. त्यांनी चित्रपटाचं लेखन, प्रमुख भूमिका,सहदिग्दर्शन आण निर्मिती केली आहे. इंडो ऑस एंटरटेन्मेंट, झुमका फिल्म्स, सासा प्रॉडक्शनच्या डॉ. प्रज्ञा दुगल, श्वेता देशपांडे आणि गणेश लोके यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रकाश जाधव चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटात गणेश लोके यांच्यासह अभिनेते सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे,
संजय मोने, शंतनू मोघे असे अनुभवी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
Sayaji Shinde
गणेश लोके गेली १७ वर्षं ऑस्ट्रेलियात वास्तव्याला आहेत. उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. २०१३ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियन नागरिक म्हणून ऑस्ट्रेलियन फेडरल निवडणूकही लढवली होती. मराठी भाषा, मराठी चित्रपटावरील प्रेमापोटी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यापूर्वी त्यांनी अयुब खानची प्रमुख भूमिका असलेल्या सरफरोशी या हिंदी देशभक्तीपर चित्रपटाचीही निर्मिती केली होती.
‘चित्रपट निर्मिती ही माझी पॅशन आहे. सामाजिक संदेश असलेले, देशभक्ती जागृत करणारे चित्रपट करण्यात मला विशेष रस आहे. तरूणांनी समाजासाठी काहीतरी भरीव योगदान द्यावं यासाठी प्रोत्साहन देणं मला महत्त्वाचं वाटतं,’ असं लोके यांनी सांगितलं