आज खरच बाबासाहेब आबेंडकर ह्यांचे ते ३ शब्द आजही आठवतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज आपल्या प्रत्येकाला अभिमान वाटला पाहीजे. त्याच कारण अस की चेंबूर मध्ये मारवली चर्च ह्या नालंदानगर ह्या ठिकाणी राहणारा मुलगा जवाहर विद्या भवन ह्या विद्यालयातुन आपल SSCच शिक्षण पुर्ण करून राहुल घोडके ह्याने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमधुन{ईस्त्रोच्या अहमदाबाद केंदात सॅटेलाईट विद्युत पुरवठा तंत्रज्ञ ह्या पदासाठी निवड झाली.

ह्या माऊलीने घरातील परिस्थीती बिकट असतानाही आणि घरोघरी जाऊन रोजची धुणीभांडी केली कॅटरींगमध्ये काम करून पैसा जमवला त्याच्या बहिणीने त्याच्या शिक्षणासाठी आपल्या भावाने खुप शिकून मोठ व्हाव म्हनुण त्या ताईने आपल्या भावाच्या शिक्षणासाठी थोडा खारीचा वाटा म्हणुन बाहेर जॉब केला आणि राहुल ने आपल्या आईच आणि बहिणीच नाव आज मोठ केल.

खरच काल मी कॉपी हा आपला मराठी चित्रपट पाहीला त्या खेड्यातील शाळेमध्ये शिक्षक मुलांना SSCच्या परीक्षेला कॉपी करून विद्यार्थींना अव्वल गुणानी उत्तीर्ण करतात आणि आपल्या शाळेच नाव हाय लेवलला नेतात पण जेव्हा शिक्षण अधिकारी शाळेत फेरफटका मारायला येतात तेव्हा शाळेत मुख्यध्यापकान पासुन ते शाळेतील शिक्षकान पर्यत कोणीच त्या शाळेत हजर नसत आणि त्या शाळेतील विद्यार्थी आपआपल्या वर्गात शिक्षक नसल्या मुळे मस्ती करत असतात.

पण जेव्हा शिक्षण अधिकारी त्या शिपायला आपल्या मुख्यध्यापकाला शाळेत बोलवल आहे म्हणून सांग तेव्हा शिक्षण अधिकारी  त्या सर्व शिक्षकांना १०वी च्या वर्गात नेतात आणी शिक्षण अधिकारी काही विद्यार्थींना प्रश्न विचारतात तर वर्गातील फक्त ३विद्यार्थी हात वरती करतात पण शिक्षण अधिकारी त्या विद्यार्थीना संधी देत नाही पण ज्यांना संधी ते शिक्षणअधिकारी देतात त्या विद्यार्थींना त्या पश्ननांची ऊत्तर सुद्धा देता येत नाही. खरच राहुल मित्रा तुझ कितीही कौतुक केल तरीही खुप कमी आहे यार असच पुढे आयुष्यात शिखराची उंची गाठत जा खुप यशस्वी हो.

शुभेच्छूक.योगेश आहिरे
नितेशराजे यादव व आपले काही सहकारी मित्रमंडळी