बदलते वातावरण आणि धावपळीचे जीवन ह्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. स्त्री-पुरुष सर्वांनाच केस गळणे आणि अकाली पडणारे टक्कल ह्याला सामोरं जावं लागतं. तुम्हीदेखील असाल केस गळण्याच्या समस्येने हैराण आणि तुम्हालाही वाटत असेल टक्कल पडण्याची भीती तर घाबरून जाऊ नका. हे सोपे उपाय करा आणि केस गळतीपासून मुक्ती मिळवा.

केस गळण्याची कारणे:

 • लोह, झिंक, प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स ह्यांसारख्या पोषकतत्वांची कमतरता केस गळतीचे प्रमुख कारण असू शकते.
 • हार्मोन्सचे असंतुलन, ताण-तणाव, वैद्यकीय कारणं ह्यामुळेदेखील केस गळू शकतात.
 • बऱ्याचदा सोडियम लौरील सल्फेट असलेल्या हैरस्टायलिंग प्रोडक्टचा वापर ह्या समस्येचे कारण बनतो.

उपाय:

योग्य शाम्पू, कंडिशनर, तेल,आहार आणि व्यायाम ह्यामुळे केसांचे आरोग्य वाढवता येते.

नारळ

 • मोठ्या आकाराचा नारळाचा तुकडा घेऊन गरम करावा आणि त्याचे तेल काढावे.
 • तेल थंड करून त्यात मिरे आणि मेथी दाणे टाकावे.
 • तेलाने डोक्याला मसाज करून 20 मिनिटानंतर धुवून टाकावे.
 • जास्वंदाच्या पानांना व फुलांना नारळाच्या तेलात टाकून हे तेल डोक्याला लावावे.
 • 30-60 मिनिटानंतर केस धुवावे.
 • आठवड्यातून एकदा हे तेल लावावे.

दही

 • दोन टेबलस्पून दह्यामध्ये एक टेबलस्पून मध आणि लिंबू टाकावा.
 • ह्या मिश्रणाचा पातळ लेप करावा.
 • हा लेप डोक्याला आणि केसांच्या मुळांना लावावा.
 • 30 मिनिटानंतर केस धुवावे.

कांदा

कांद्यामध्ये अँटिबॅक्टेरीअल गुण आहेत. ह्यात असणारे सल्फर रक्ताभिसरण वाढवून केसांची वाढ करते.

 • कांद्याचा रस डोक्याला 20-30 मिनिटे लावावा.
 • नंतर पाण्याने केस धुवावे.
 • आठवड्यातून एकदा हा प्रयोग करावा.

आवळा

केसांची वाढ आणि निरोगी केसांसाठी आवळा अत्यंत गुणकारी आहे.

 • आवळ्याची पावडर आणि लिंबाचा रस ह्यांचे मिश्रण करावे.
 • हे मिश्रण केसांना व डोक्याला लावून मसाज करावा.
 • तासाभराने पाण्याने केस धुवावे.

खाण्यात ह्या गोष्टींचा वापर करा:

 • पालक
 • गाजर
 • अंडी
 • अक्रोड

ह्या गोष्टी टाळा:

 • तणाव
 • गरम पाण्याने केस धुणे
 • ओल्या केसांना विंचरणे

भक्ती संदिप

(Nutritionist in Foodvibes Grocers)