विकी कौशलही म्हणतो ‘जगणं हे न्यार झालं जी’ ‘हिरकणी’ मधील गीताचे
लाँचिंग मधुराचा सुमधूर आवाज
बॉलीवूड अभिनेता उरी फेम विकी कौशलही ‘जगणं हे न्यार झालं जी’ हे गाणं गुणगुणत आहे. हिरकणी या आगामी मराठी चित्रपटातील अमितराज याचे मनाला भावणारे संगीत व प्रसिद्ध गायिका मधुरा कुंभारच्या मधुर आवाजात हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. विकी कौशलच्या हस्ते या गाण्याचं लाँचिंग झाले असून दोन दिवसात या गाण्याला लाखो व्ह्यू मिळाले.
चिन्मय मांडलेकर लिखित, प्रसाद ओक दिगदर्शित हिरकणी हा मराठी चित्रपट 24 ऑक्टोबर रोजी आपल्या भेटीला येत आहे. मुलासाठी आईच्या जीवाची होणारी घालमेल या चित्रपटातून ऐतिहासिक पद्धतीने मांडण्यात आली आहे. त्यात ‘जगणं हे न्यार झालं जी’ या गाण्याला स्वतः अमितराज व प्रसिद्ध गायिका मधुरा कुंभार यांनी स्वरबद्ध केलं आहे. नायक, नायिका यांच्यातील रोमॅंटिसीजम दर्शविणाऱ्या या गाण्याला मधुराने आपल्या भावनिक, एक्सप्रेसिव आवाजाने अधिक च फुलवले आहे.
माझ्या आवाजविषयी अमितराजला पूर्ण आत्मविश्वास होता, मी या गाण्याला न्याय देऊ शकेन, असा त्याचा विश्वास होता. त्याचा विश्वास आपले प्रयत्न यातून उत्तम अस गाण साकारलं आहे. भावनांनी ओतप्रोत भरलेलं हे गाणं आहे, त्यातील नायिका ही खट्याळ, मिश्किल स्वभावाची आहे, एकंदरीत माझा स्वभाव व इमोशन व एक्सप्रेसिवली मी हे गाणं गायलं आहे, त्यात अमितराजने मला खूप स्वातंत्र्य दिलं. तो स्वतः एक उत्तम गायक असल्याने त्याच्यासोबत गाणं ही माझ्यासाठी एक सुवर्णसंधी होती.
अमितराज सोबत बऱ्याच वेळा काम केलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारामधील गाणी गायिल्याने त्याला माझ्या आवाजाची कल्पना होती, तो लहेजा, ठसका माहीत होता. स्वतः संगीत दिग्दर्शक असल्याने गाण्यात नेमकं काय हवं हे त्याला उत्तम प्रकारे माहीत आहे. म्हणून त्याने स्वतः गावं असा आम्ही आग्रह केला व त्याने त्याच्या आवाजाने या गाण्याला चार चांद लावले आहेत. अत्यंत उत्कृष्ट गाणं झालं असून प्रेक्षकांच्या पसंतीस हे गाणं उतरले आहे. गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर दोन दिवसात या गाण्याला लाखो व्ह्यू मिळाले आहे….
अश्या या संगीतमय आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाला आणि मधुराच्या वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा….