झी युवा’ ही वाहिनी निरनिराळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांसाठी नेहमीच घेऊन येते. तीन वर्षांहून अधिक काळ, आपली ही खासियत जपणारी वाहिनी, प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीची झालेली आहे. आपल्यासाठी ‘झी युवा’ कोणती नवीन मेजवानी घेऊन येणार, याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत असतात. अशीच एक खुमासदार आणि भन्नाट प्रेमकहाणी लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. ‘प्रेम पॉयजन पंगा या नव्या मालिकेचा प्रोमो, वाहिनीवर प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. ऑक्टोबरमध्ये सुरु होणार असलेल्या या मालिकेची जोरदार चर्चा या निराळ्या प्रोमोमुळे सुरु झालेली आहे.

आज असं कोणतेही प्रियकर प्रेयसी नसतील ज्यांची एकही सेल्फी नसेल , पण “ प्रेम पॉयजन पंगा “ मधील आलाप आणि जुई यांचे थोडे वेगळे आहे .त्यांच्या  रिलेशनशिप ला अनेक वर्ष झाली मात्र आजपर्यंत त्यांनी एकही सेल्फी काढला नाही. आलाप नेहमीच जुई ला विनंती करायचा मात्र जुई नेहमीच त्याला हे ना ते कारण देऊन सेल्फी पुढे ढकलायची . शेवटी आलापने जुईला खूप प्रेमात सांगितले एकचं  सेल्फी काढूया फक्त माझ्यासाठी. नाही नाही म्हणत शेवटी जुई तयार झाली मात्र मनातून ती घाबरली होती कारण तिला माहित होत कॅमेरा मध्ये काय  दिसणार आहे. हीच सगळी मजा आपल्याला प्रेम पॉयजन पंगाच्या  नवीन प्रोमो मध्ये पाहायला मिळते. आलाप सेल्फी काढतो मात्र सेल्फीमधला जुईचं रूप पाहून चक्कर येऊन पडतो कारण मोबाईल कॅमेरा च्या सेल्फी मध्ये जुईच्या जागी एक नागीण असते.

तर मग नक्की धमाल काय आहे. जुई च्या जागी नागिणीचा फोटो  का आला असेल .. ? जुई नक्की कोण आहे ? या सर्व प्रश्नाची उत्तरे पाहण्यासाठी बघत राहा प्रेम पॉयजन पंगा २८ ऑक्टोबर पासून संध्याकाळी ८:३० वाजता केवळ आपल्या आवडती वाहिनी झी युवावर !!