The First Jodi To Win 25 Lacs In This Season’s ‘Kon Hoil Marathi Crorepati’
कोण होईल मराठी करोडपतीमध्ये वैशाली कुलकर्णी आणि सोहन यांनी जिंकले २५ लाख !
वैशाली आणि सोहान खेळले ५० लाखाचा प्रश्न …
कोण होईल मराठी करोडपती म्हणजे महाराष्ट्राचा महामंच… जिथे होतो प्रत्येकाच्या सुखाचा शुभारंभ.
महाराष्ट्रातील अनेक लोकांचा स्वप्नपूर्ती करणारा, आपल्या ज्ञानाने नशीब बदलण्याची सुवर्णसंधी देणारा मराठी
टेलिव्हिजनवरील सर्वोत्तम महामंच म्हणजे कलर्स मराठीवरील Kon Hoil Marathi Crorepati “कोण होईल मराठी करोडपती”! महाराष्ट्राच्या या लोकप्रिय
अश्या कार्यक्रमाचे तिसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले, ज्यामध्ये पहिल्यांदाच बक्षिसाची रक्कम तब्बल तीन करोड रुपये
इतकी विशाल ठेवण्यात आली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे खूप प्रेम लाभत आहे. येत्या आठवड्यात या कार्यक्रमामध्ये मुळचे
बीडमधील पण सध्या साताऱ्यामध्ये स्थायिक असलेले बहिण – भाऊ वैशाली आणि सोहन कोण होईल मराठी करोडपतीच्या
मंचावर आले आणि त्यांनी हा अद्वितीय खेळ खेळण्यास सुरुवात केली. उत्तम तयारी करून आलेले आणि पहिल्या
प्रश्नापासून उत्तम खेळणाऱ्या या बहिण भावांनी तब्बल २५ लाख इतकी धनराशी जिंकली.
25 Lacs Winning Couple Kon Hoil Marathi Crorepati
आपल्या अनेक स्वप्नांची पूर्ती करण्याची इच्छा घेऊन वैशाली आणि सोहन कोण होईल मराठी करोडपतीच्या महामंचावर
आले. वैशाली हिला लोकांचे चेहरे वाचण्याची कला अवगत असून तीला भारत सरकारचा तरूण कलाकार शिष्यवृत्ती पुरस्कार
मिळाला आहे.
सोहन हा रोबोटिक्स शिकत असून त्याला भारतीय सेनेच्या मदतीसाठी रोबोट बनावायची इच्छा आहे ज्यामुळे
जीवितहानी कमी होईल आणि आपल्या भारतीय सैन्याची मदत देखील होईल.
वैशाली आणि सोहन घरी मेणाच्या पणत्या बनवतात. कोण होईलच्या मंचावर ते “सुखाचा शुभारंभ” असे लिहिलेल्या पणत्या
घेऊन आले होते ज्या पणत्या स्वप्नीलला दिल्या.
तेंव्हा बघायला विसरू नका कोण होईल मराठी करोडपती २१ आणि २२ नोव्हेंबर रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर.