भारतात कोणाचे पहिले आधार कार्ड बनवले गेले आहे ते तुम्हाला माहित आहे का? सध्या देशातील जवळपास ९० टक्के लोकांकडे आधार कार्ड आहे. देशाची लोकसंख्या 135 कोटींपेक्षा जास्त आहे. आता करोडो लोकांमध्ये सगळ्यात पहिले आधार कार्ड कोणाचे बनले असेल याचा अंदाज लावणे अवघड आहे, परंतु काही रिपोर्टला ग्राह्य धरलं तर आपल्याला पहिल्या आधार कार्ड विषयी माहिती मिळू शकते.
आता आधार आपली गरज बनली असली तरी यापूर्वी आधारच्या जागी मतदार ओळखपत्र वापरला जात होतं. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की आधार कार्डची सुरूवात यूपीए सरकारमध्ये झाली होती, परंतु त्याची गरज लाँचच्या खूप वर्षानंतर पडली.
देशातील अनेक महत्त्वपूर्ण सरकारी कामांसाठी आधार आवश्यक केला गेला. आता आधारची गरज नसणारी अशी कोणतीही सरकार कामे नाहीत, सगळीकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. एखाद्या बँकेत खाते उघडण्यापासून ते सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्यापर्यंत सर्व कामांमध्ये आधार आवश्यक असतो.
पहिला आधार कार्ड प्राप्तकर्ता एक पुरुष नसून एक स्त्री आहे ज्यांचे नाव रंजना सोनवणे आहे. ज्या स्त्रीला पहिले आधार कार्ड मिळाले होते त्या नंदुरबार जिल्ह्यातील तंभळी गाव मध्ये राहतात. त्यांचे तंभळी गाव हे दुर्गम भागात आहे. 2010 साली जेव्हा त्यांना आधार मिळाला तेव्हा असे वाटले की त्यांच्या जीवनात एक मोठा बदल होईल परंतु असे काहीही झाले नाही.
जरी रंजना आणि त्यांचे गाव काही काळ चर्चेत राहिले होते, परंतु त्यांच्या गावाची परिस्थिती आजही तशीच आहे. टाइम्स ऑफ इंडियाला जेव्हा रंजनाबद्दल कळले तेव्हा रंजना सांगतात की 2010 मध्ये नेते गावात आले, त्यांचे फोटो काढले आणि त्यांना आधार कार्ड दिले व तेथून निघून गेले. यानंतर कुणीही विचारलं सुद्धा नाही. आज गाव आणि त्यांची परिस्थिती सारखीच आहे.
जरी रंजना सोनवणे कामाच्या शोधात आहेत पण आता त्यांची आता एक वेगळी ओळख आहे. आधार कार्ड मिळवणाऱ्या त्या पहिली भारतीय आहे. रंजना या रॊजंदारी मजूर आहेत आणि खेड्यातील जत्रांमध्ये खेळणी विकतात.