आपण कितीही ऑनलाईन व्हिडिओ पाहू शकता, परंतु आपण दिवसातून एकदा तरी टीव्ही पाहतोच, जेव्हा आपण टीव्ही पाहता तेव्हा आपल्या लक्षात आले असेल की बर्‍याच वेळा एक रैंडम नंबर टीव्ही स्क्रीनवर दिसतात जे फक्त काही काळासाठी दिसत असतात. हे नंबर टीव्ही स्क्रीनमध्ये कधी कधीच दिसायला मिळतात. परंतु टीव्ही स्क्रीनवरील हा रैंडम नंबर काय आहे?

आपल्या टीव्ही मालिकेच्या मध्यभागी हा रैंडम नंबर का येतो याबद्दल आपण कधी विचार केला आहे का? आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो को या नंबरचा वापर करून तुमच्या घरापर्यंत पोहचता येते. तर आज आम्ही या रैंडम नंबर विषयी आपणाला माहिती सांगणार आहोत.

हा नंबर टीव्हीवर चालणार्‍या कोणत्याही मालिकेतील अथवा चित्रपटातील भागामध्ये दिसायला मिळेल किंवा जर तुम्ही म्हणाल तर सर्वात लोकप्रिय कार्यक्रमात म्हणजेच एखाद्या क्रिकेट मॅचच्या लाईव्ह टेलिकास्टमध्ये हा रँडम नंबर हमखास दिसतो.

सेटटॉप बॉक्स हा एक जेनेरेटोर आहे आणि तुमच्या टीव्हीवर तो रँडम नंबर दर्शवतो, परंतु त्याचवेळी जर आपण दुसरी एखादी टीव्ही पहिली तर आपल्याला त्या टीव्हीवर दुसरा रँडम नंबर पाहायला मिळेल.

टीव्ही स्क्रीनवर हे रैंडम नंबर दर्शविण्यामागचे मुख्य कारण म्हणजे ब्रॉडकास्टर द्वारे आपल्या टीव्ही मालिकेतील प्रसारण किंवा क्रिकेट लाईव्ह टेलिकास्टचे संरक्षण करणे हे आहे.

जस कि ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ एक प्रसिद्ध मालिका आहे, तर काही लोक ही मालिका मोबाईलवर शूट करून रेकॉर्ड करतात किंवा फ्री मध्ये यूट्यूब वर लिव्ह स्ट्रीम करतात.

काही लोक याला इंटरनेटवरील वेबसाईटवर देखील अपलोड करतात. त्यामुळे या प्रसिद्ध मालिका ऑनलाईन लीक होतात वर निर्मात्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते.

परंतु टीव्हीवरून कार्यक्रम रेकॉर्ड करताना हा रँडम नंबर देखील रेकॉर्ड केला जातो. तर या नंबरवरून हा व्हिडिओ कोणी अपलोड केला आहे आणि सेटटॉप बॉक्सचे स्थान कुठे आहे हे देखील शोधले जाऊ शकते.

हे कळताच आपला सेट बॉक्स बंद केला जाऊ शकतो, जर टीव्ही भागातील मालक किंवा प्रसारक टीव्हीवरून व्हिडिओ रेकॉर्ड केलेल्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करू शकते. कारण आपले नाव आणि घराचा पत्ता देखील या रँडम नंबरसह ओळखला जातो.

भारत सरकार एक सेटटॉप बॉक्स ठेवण्यास सांगत आहे जेणेकरून या सर्व रँडम नंबर प्रत्येकाच्या टीव्हीमध्ये स्वतंत्रपणे दिसू शकतील. याशिवाय किती लोक एखादा कार्यक्रम पहात आहेत हे देखील सहज समजेल.