एन्टरटेन्टमेंट ट्रेड मासिक अवार्ड-२०१६ च्यावतीने विविध क्षेत्रातील कलागुणांचा सन्मान
क्षेत्र कोणताही असो, त्या क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण करणारे अनेक व्यक्तिमत्व आपल्या समाजात पाहायला मिळतात, त्यांच्या याच कामाची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थेकडून या व्यक्तीमत्वांचा सत्कार केला जातो.
एन्टरटेन्टमेंट ट्रेड मासिकला ५ वर्ष पूर्ण झाल्याच्या वतीने एन्टरटेन्टमेंट ट्रेड मासिक अवार्ड-२०१६ या अवोर्डची सुरुवात ऐन.पी यादव यांनी केली. या कार्यक्रमांतर्गत दादर येथील स्वांत्र्यवीर सावरकर सभागृहात हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
चित्रपट, सामाजिक, क्रीडा,वैदीकीय आणि औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांचा या सन्मान सोहळ्यात समावेश होता. अतिशय आलिशान आणि आल्हाददायी वातावरणात पार पडलेल्या या सन्मान सोहळ्यात हिंदी आणि मराठी जगतातील अनेक नामवंत कलावंतांनी देखील हजेरी लावली होती.
सिने कलावंतांच्या लखलखीत बहरलेल्या या सोहळ्यात वेंगसरकर, धनराज पिल्ले या खेळाडूंनीदेखील विशेष उपस्थिती लावली होती. क्रीडाक्षेत्रात विशेष कर्तृत्व गाजवल्यानिमित्त या दोघांचा देखील सन्मान करण्यात आला. तसेच फिटनेस तज्ञ मिकी मेहता यांना फिटनेस गुरु या नावाने सन्मानित करण्यात आले. बॉलिवूडचा गोल्ड मेन बप्पी लहरी यांना एव्हरग्रीन म्यूजिकल जिनियस या उपाधीने गौरविण्यात आले, तर बॉलिवूडचे जान असणारे धर्मेंद्रजी यांना गॉड ऑफ सिल्वर स्क्रीन हा सन्मान देण्यात आला.
प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना डिरेक्टर विथ डिफरंट ने तर कोरियोग्राफर रेमो डिसुझा यांना इन्स्पिरेशन फॉर मिलियन ची उपाधी देत गौरविण्यात आले. त्याचबरोबर सामाजिक विशेष कामगिरी बजावणारे पोपटराव पवार यांना तसेच डॉ. बिपीन गोंजारी आणि शिल्पा गोंजारी यांना देखील विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा केळकर आणि प्रसाद फणसे यांनी केले. पुष्कर जोग, अंकिता तारे, सिद्धेश पै, सॅटरिक डीसुजा, सुकन्या काळन, आणि नृत्यसम्राद्नी मानसी नाईक हिच्या डान्स परफोरॅमनसने कार्यक्रमात जान आणली.. तसेच धनश्री देशपांडे, सुप्रिया जोशी या गायकामुळे सोहळा सुरमय वातावरणात पार पडला. तसेच संजय लोंढे यांच्या शांताबाई या गाण्याने प्रेक्षक थिरकले. –
Entertainment Trade Awards 2016 Photo