Sairat Fame Rinku Rajguru




Sairat Fame Rinku Rajguru Dance Perfomance On Unch Majha Zoka 2016
सैराट सिनेमाच्या प्रमोशनवेळी व त्यानंतरही रिंकु राजगुरूने अनेकदा आपल्याला नृत्याची आवड असल्याचं सांगितलं आहे. सैराट सिनेमातील रिंकुची अनेक गाणी लोकप्रिय झाली. या सिनेमातील गाण्यांमध्ये झिंगाट सोडलं तर कुठे तिला मनसोक्त नाचायला मिळालं नाही. मात्र तिने उंच माझा झोका या पुरस्कार सोहळ्यात आपलं हे स्वप्न पूर्ण करत आहे.

 

Rinku Rajguru Best

 

सैराट सिनेमातील रिंकु राजगुरूने संपूर्ण देशाला वेड लावलं आहे. अवघ्या १५ व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार स्विकारून रिंकूने आपल्या अभिनय कौशल्यावर शिक्का मोर्तब केला आहे. सैराट सिनेमातून प्रेक्षकांसमोर आलेली रिंकु राजगुरू येत्या रविवारी आपल्याला एका वेगळ्याच ढंगात दिसणार आहे. उंच माझा झोका २०१६ या पुरस्कार सोहळ्यात रिंकु राजगुरूचा आपल्याला दिलखेचक नृत्याविष्कार पाहायला मिळेल. तू ग दुर्गा तू भवानी असं म्हणतं रिंकू आपलं आगळं वेगळं रूप प्रेक्षकांसमोर घेऊन येईल.  रविवार २८  ऑगस्ट संध्या. ७ वाजता हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

 

Rinku Rajguru Dance

 

आर्ची चा रुद्रावतार 

Rinku Rajguru