तुम्ही महाराष्ट्र भर फिरत असताना तुम्ही अनेक नगरे महानगरे तसेच खेडी पाडी पाहिली असतील परंतु त्याचबरोबर तुम्हाला अशी देखिल गावे दिसली असतील ज्यांच्या नावापुढे बुद्रुक व व खुर्द हे शब्द लावलेले असतात. उदाहरणार्थ :पिंपळगाव बुद्रुक-पिंपळगाव खुर्द,गोंदवले बुद्रुक-गोंदवले खुर्द,ऐतवडे बुद्रुक-ऐतवडे खुर्द,आरे बुद्रुक-आरे खुर्द तेलगांव खुर्द, तेलगांव बुद्रुक, डीग्रस खुर्द डीग्रस बुद्रुक,

देवगांव खुर्द, देवगांव बुद्रुक, बोरगांव खुर्द, बोरगांव बुद्रुक, हादगांव खुर्द, हादगांव बुद्रुक, झोडगांव खुर्द, झोडगांव बुद्रुक, धामणगांव खुर्द, धामणगांव बुद्रुक, पिंपळगाव खुर्द, पिंपळगांव बुद्रुक, महाराष्ट्रात असे अनेक गावे आहेत त्यातील काही तुरळक गांवे आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत इत्यादी.

मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक गावे आहेत ज्यांच्या नावाअगोदर बुद्रुक व खुर्द लावलेले असते. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की अरेच्या ही बुद्रुक आणि खुर्द ही काय भानगड आहे. चला तर मग आज आपण जाणुन घेऊयात बुद्रुक आणि खुर्द यांचा इतिहास.

तर मित्रांनो शिवकाळापुर्वी आपल्या महाराष्ट्रात इस्लामी भाषेचा व सत्तेचा खुप मोठा अमल होता,त्यामुळे सगळीकडे उर्दू मिश्रित किंवा फारशी मिश्रित भाषा बोलली जायची. आदिलशाही,कुतुबशाही व मोघल यांच्या अमलात असलेल्या प्रदेशात बुद्रुक व खुर्द हे शब्द वापरले जायचे.

एखाद्या रस्त्यामुळे, किंवा नदी अथवा ओढ्यामुळे एखाद्या गावाचे जर दोन भाग पडत असतील तर ते भाग सम-समान कधीच नसायचे,एक भाग छोटा असायचा व एक गाव मोठा असायचा.

त्यातील मोठ्या भागाला बुजुर्ग व छोटया भागाला खुर्द म्हटले गेले,बुजुर्ग म्हणजे मोठा आणि खुर्द म्हणजे छोटा. पुढे बुजुर्ग ह्या शब्दाचा अपभ्रंश होऊन बुद्रुक हा शब्द प्रचलित झाला व आज आपल्याला अनेक गावांच्या सुरवातीला बुद्रुक व खुर्द हे शब्द लागल्याचे दिसुन येते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.