मंडळी, काही आठवड्यांपासून सोशल मिडीयावर वशाचा रात्रीचा घोळ हे आपण ऐकतोय, बघतोय. आणि ह्याच घोळाने आपली उत्सुकता वाढवली. वसंत खाटमोडेचा रात्रीचा कसला घोळ आहे, ह्या प्रश्नाला सोशल मिडीयावर उधाण आल होतं. सिनेमाच्या पोस्टरने, मोशन पोस्टरने सगळ्यांचेच लक्ष्य वेधून घेतले. गावरान बाज, रांगड्या भाषेतील प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली अस म्हंटल तर वावग ठरणार नाही.

अखेर आटपाडीच्या लैला मजनूचं नुकतच लग्न लागल. नेटकऱ्यांची आटपाडी नाईट्स सिनेमाच्या ट्रेलरने लक्ष्य वेधून घेतले होते. ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ ‘देवा धाव देवा पाव’ ह्या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आणि अखेर २७ डिसेंबरला प्रतीक्षा संपली. सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. सिनेमाच्या पदरात प्रेक्षकांचं भरभरून प्रेम पडलं. तुफान प्रतिसाद हा महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणाहून मिळाला. सिनेमातील अतरंगी पात्रांनी तर प्रेक्षकांच्या मनात घर केले. चिमटे काढत, हसवत,रडवत मंत्रमुग्ध करत सिनेमात महत्वाच्या लैंगिक प्रश्नांची, गैरसमजांची उकल केली.

कित्येक ठिकाणच्या थेटरमध्ये ह्या सिनेमाचे शोज हाउसफुल गेले हे ह्या सिनेमाचं मोठ यश म्हणाव लागेल. पाल्यांपासून पालकांपर्यंत अशा बऱ्याचजणांनी हा सिनेमा पहिला. ह्या सिनेमाचा संदेश तरुणाईच्या मनात रुजला पाहीजे. विशेष म्हणजे दिग्दर्शक नितीन सुपेकर यांचा हा उद्देश तरुणाईपर्यंत नुसता पोहचला नाही अस म्हणायला हरकत नाही. वेगवेगळ्या समीक्षकांनी ह्या सिनेमाला चार, साडे चार, पाच स्टार देवून सिनेमा पाहण्याचा आग्रहदेखील रसिकांना केला.

वेगवेगळ्या न्यूज चॅनलने सिनेमाची दाखल घेतली. सिनेमातील सगळ्याच पात्रांनी रसिकांना भुरळ पाडली यात काही शंका नाही.  प्रेमाचा जांगडगुत्ता गाण्याने रसिकाना अंग थिरकायला भाग पाडले, तर देवा धाव देवा पाव गाण्याने अश्रू अनावर करून सोडले. तर मंडळी, ह्या सिनेमात मनोरंजनासोबत महत्वाच्या गोष्टी जाणून घेता येणार आहेत. तर तुम्ही हा सिनेमा पाहिला नसेल तर, लवकरच तुमच्या जवळच्या थेटरमध्ये जावून, सिनेमा पहा….