कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणायचे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं..मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं; उर्दुमधे इश्क म्हणून प्रेम करता येत; व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं; कोन्वेंटमधे शिकलात तरी प्रेम करता येतं ! महत्वाच काय तर प्रेम हे कुठेही आणि कधीही करता येत . अट एकचं असते , प्रेम मनापासून करावं . पण अशी मनापासून प्रेम करणारी माणसे असतात तरी कशी ? तर अशी माणसं ही असतात आणि हेच दाखवायला झी युवा वाहिनीवर दिनांक १२ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रोज रात्री ९ वाजता येतेय नवीन एक भन्नाट विनोदी मालिका जिचं नाव आहे ” डॉक्टर डॉन ” .
झी युवा वाहिनीने आजवर फुलपाखरू,लव्ह लग्न लोचा सारखे अनेक उत्तमोत्तम कार्यक्रमांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे .डॉक्टर डॉन ही मालिका सुद्धा अपवाद नक्कीच नसणार .अभिनेता देवदत्त नागे आणि अभिनेत्री श्वेता शिंदे यांची मेडिकल कॉलेजच्या पार्श्वभूमीवरील प्रत्येकाला वेड लावणारी आणि धमाल मनोरंजन करणारी एक अतिशय हटके लव्हस्टोरी झी युवा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे .
देवदत्त नागे डॉक्टर डॉन या मालिकेत एका इंटरनॅशनल डॉन ची भूमिका करत आहेत . तर ही गोष्ट आहे एका डॉन देवा सुर्वेची. बर हा डॉन कोणी साधा सुद्धा गल्लीतला लफ़ंगा नाहीये . हा एक नावाजलेला पण सुविख्यात इंटरनॅशनल डॉन आहे .सुविख्यात या करता कारण जरी तो डॉन असला तरी तो या गोष्टीचा व्हिलन नाहीय . सगळी चुकीची काम तो योग्य मार्गानेच करतो. पण त्याचा एवढा दरारा आहे की मुंबईच नव्हे तर अक्ख्या जगातील गुंड घाबरतात आपल्या या देवा भाईला ! तर अशा या इंटरनॅशल डॉन ला काही कारणात्सव त्याचा सगळा जमलेला व्यवसाय बंद करून एका मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घ्यावी लागते . आता हे का करावे लागते या साठीच देवदत्त नागे सांगतो झी युवा वाहिनीवर डॉक्टर डॉन चा आजचा पहिला एपिसोड चुकवू नका !! पहिला भाग दिनांक १२ फेब्रुवारी म्हणजेच आज रात्री ९ वाजता झी युवा युवा या वाहिनीवर पहायला मिळणार आहे.
या मालिकेतील दुसरे महत्वाचे पात्र म्हणजे अभिनेत्री श्वेता शिंदे यांचे,मोनिका श्रीखंडे ही भूमिका त्या करत असून आजवर त्यांनी केलेल्याइतर सर्व भूमिकांपेक्षा ही एक वेगळी अशी भूमिका त्या करत आहेत. देवदत्त ज्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो या कॉलेजच्या डीन ची भूमिका त्या करत आहेत . स्वभावाला अतिशय कडक असलेल्या या डीन मॅडमवर मात्र आपला देवा पूर्णपणे फिदा आहे .. तिच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी खुशखबर ठरली आहे. त्यांच्या लाडक्या अभिनेत्रीला, मोठ्या कालावधीनंतर पडद्यावर पाहण्याची सुवर्णसंधी त्यांना मिळणार आहे. एवढ्या वर्षानंतर पुनरागमन करत असलेली श्वेता, आजही तिच्या लुकच्या जोरावर सर्वांना घायाळ करते आहे. लाल साडीतील तिचा झकास लुक पाहून, मालिकेतील तिची भूमिका पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. झी युवावरील डॉक्टर डॉन या मालिकेत, मेडिकल कॉलेजच्या एका कठोर आणि शिस्तप्रिय डीनची भूमिका श्वेता साकारते आहे. देवदत्त नागे साकारत असलेला डॉन तिच्या पुरता प्रेमात वेडा झालेला आहे. मालिकेमधील तिचा पहिलाच लुक बघून, ती संपूर्ण मालिकेत ‘बोल्ड अँड ब्युटीफुल’ दिसणार असल्याचे लक्षात आले आहे.पण या लव्हस्टोरीची सुरुवात कशी होईल हे सुद्धा प्रेक्षकांना पाहण्यासारखे असेल. कॉलेज मध्ये घडणारा हा ड्रामा युवा मंडळींना नक्कीच आकर्षित करेल .
या मालिकेतील तिसरे महत्वाचे पात्र आहे ते म्हणजे जेष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे . यांच्या भूमिकेत एक वेगळाच स्वॅग आहे . अतिशय कूल असेलेली ही अभिनेत्री श्वेताची आई असलेली ही एक आजी सुदधा दाखवली आहे . झी युवावर रोहिणी हट्टंगडी पाहिल्यांदाच काम करत असून त्या अतिशय मस्तीखोर स्वभावाच्या दाखवल्या आहेत. त्या सतत मोबाईल वर तरुणाईचे खेळ खेळत असतात. त्याचबरोबर त्या अगदीच जिंदादिल स्वभावाच्या दाखवल्या आहेत .झी युवा ही वाहिनी मनाने युवा असलेल्या सर्वांसाठी आहे त्यामुळे त्या आजीची भूमिका करत असल्या तरी कूल आजी आहेत .
डॉक्टर डॉन ची गोष्ट ही एका महाविद्यालयीन लव्ह स्टोरी आहे . एक अतिशय मोठा इंटरनॅशनल डॉन एका कारणासाठी स्वतःचे सगळे धंदे बंद करून मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो . एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये होणारी विद्यार्थ्यांची धमाल , कॉलेजचे विश्व , त्यात घडणाऱ्या गमतीजमती , पाहिलं प्रेम अशा अनेक गोष्टी ज्या झी युवा वाहिनीची खासियत आहेत त्या आपल्याला डॉक्टर डॉन मध्ये पहायला मिळणार आहे . मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थांसोबत डॉन देवा स्वतःला कसा ऍडजस्ट करतो , तो ज्या कारणासाठी इथे आला आहे ते त्याचे काम पूर्ण होते का , तो ज्याप्रकारे कॉलेजच्या डीन मॅडमच्या प्रेमात पडतो अशा अनेक मनोरंजक गोष्टी या मालिकेतून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे . त्याचबरोबर नावाजलेल्या कलाकाराची ही फौज अभिनयाच्या बाबतीत कमाल करेल यात काहीच शंका नाही.
देवदत्त नागे या मालिकेबद्दल सांगताना म्हणाले , “विनोदी प्रकारात मी कधीच काम केलेलं नाही. त्यामुळे या रोलसाठी मला जेव्हा झी युवा वाहिनीने विचारलं तेव्हा मला याचा आनंद झाला होता. या मालिकेत मला डॉनचं काम करावं लागणार आहे. त्यातच एक विनोदी छटा सुद्धा जपावी लागणार आहे. त्यामुळेच माझ्यासाठी ही भूमिका खूपच आव्हानात्मक असणार आहे. मला नवनवीन प्रकारच्या भूमिकांचं आव्हान पेलायला खूप आवडतं. विनोदी मालिका, हे आव्हान माझ्यासाठी खूपच छान असेल. मला डॉनच्या भूमिकेत पाहायला माझ्या चाहत्यांना सुद्धा खूपच आवडेल यात काहीच शंका नाही. ही नवी मालिका झी युवावरील इतर मालिकांसारखी प्रेक्षकांच्या आवडीची ठरेल याची खात्री वाटते. माझ्या इतर भूमिकांवर चाहत्यांनी जसं भरभरून प्रेम केलं तसंच याही भूमिकेला प्रेम मिळेल अशी माझी इच्छा आहे.”
श्वेता शिंदे या मालिकेबद्दल सांगताना म्हणाल्या , “प्रेक्षकांना आणि चाहत्यांना आश्चर्य वाटेल अशी एखादी गोष्ट करणं नेहमीच खास असतं. ‘डॉक्टर डॉन’ मालिकेत मी साकारत असलेली डीनची भूमिका, ही मी आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. डीन कामाच्या बाबतीत चोख आणि शिस्तप्रिय आहे. देवासारख्या डॉनच्या संपर्कात आल्यानंतर तिचे आयुष्य कसे बदलून जाते, हे या मालिकेत पाहायला मिळेल. ‘झी युवा’च्या या दर्जेदार मालिकेत, देवदत्त नागेसोबत काम करण्याची संधी मिळणे, हा दुग्धशर्करा योग आहे. प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करण्यासाठी मी साकारत असलेली ही वेगळी भूमिका सगळ्यांना नक्की आवडेल, याची मला खात्री वाटते आहे.”
रोहिणी हट्टंगडी मालिकेबद्दल सांगताना म्हणाल्या , ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेत मी साकारत असलेली भूमिका सुद्धा आजीचीच आहे. पण, आजवर मी साकारलेली आजी आणि ही आजी यात फरक आहे. ‘डॉक्टर डॉन’मधील आजी एकदम डॅशिंग आणि बिनधास्त आहे. ही आजी, आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या घटनांची मजा घ्यावी, आयुष्य झकास पद्धतीने जगावं अशा विचारसरणीची आहे. त्याचबरोबर ही भूमिका विनोदी धाटणीची आहे. ही मालिका ‘झी युवा’ची असल्यामुळे, ती खास आणि वेगळ्या प्रकारची निश्चितच असणार यात शंका नाही. ‘झी’ सोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच छान असतो. ही भूमिका मला आवडली, हेदेखील भूमिका स्वीकारण्याचं एक कारण होतंच. या मालिकेमुळे ओळखीच्या लोकांसोबत काम करण्याची संधी सुद्धा मिळाली. त्यांच्या मस्तीत सहभागी होण्याची संधी यामुळे मिळणार आहे