आज खूप मालिका मराठी मध्ये सुरू झालेल्या आहेत. ज्या की सध्या खूप लोकप्रिय होत आहेत. मुलगी झाली हो ही मालिका रसिकांना फार आवडत आहे. त्यातील पात्र आणि त्यांचे बोलण हे खूप पसंत पडत आहे. तर त्यातील माऊ हे पात्र साकारणारी अभिनेत्री तर शोधुन कुठे सापडणार नाही अशी आहे. ती कोण हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. मालिकेतील नायिका अर्थात न बोलता येणारी माऊ आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि हवभावाने प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहे.
या मालिकेतून योगेश सोहोनी याने शौनक या प्रमुख नायकाची भूमिका साकारली आहे. माऊ आणि शौनक यांची जुळून आलेली केमिस्ट्री यासोबतच शर्वानी पिल्लई यांनी साकारलेली माऊची आई देखील भाव खाऊन जाते. आज मालिकेतील माऊची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…कारण काय आपल्याला पात्र काय करत ते ठाऊक असतं. पण खऱ्या आयुष्यात कसं जगतं हे नाही. तेच आज आपण जाणून घेऊयात.
माऊची भूमिका साकारली आहे “दिव्या सुभाष पुगावकर” या अभिनेत्रीने. मालिकेत माऊ मुकी असल्याने तिचे कधीही न बोलणारे पात्र दर्शवले आहे परंतु खऱ्या आयुष्यातील माऊला बोलता येते बरं का.
दिव्या मूळची माणगावची परंतु तिचे संपूर्ण शिक्षण मुंबईतच झाले आहे. दिव्याने या मालिकेअगोदर प्रेमा तुझा रंग कसा आणि विठुमाऊली या लोकप्रिय मालिकेतून काम केले आहे. काम भारी केलं की ते लोकाना आवडतच. त्यामुळे सध्या तिचं काम लोकांना फार आवडत आहे.
मुलगी झाली हो या मालिकेतून तिला पहिल्यांदा प्रमुख नायिका साकारण्याची संधी मिळाली. अभिनयासोबतच दिव्याला मॉडेलिंगची देखील आवड आहे. २०१७ साली मुंबईची सुकन्या स्पर्धेत तीने मोस्ट पॉप्युलर फेसचे मानांकन प्राप्त केले.
तर २०१९ सालच्या श्रावण क्वीन या सौंदर्य स्पर्धेत सहभाग दर्शवून दिव्याने मिस टॅलेंटेडचा मानही पटकावला आहे. दिव्याने साकारलेल्या माऊच्या भूमिके वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे तिला या भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा..
कारण काय तर एखादा काम चांगलं करत असेल तर त्या व्यक्तीला शुभेच्छा दिल्या की जरा आत्मविश्वास खूप येतो.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.