पुनश्च दिल, दोस्ती ,दुनियादारी

Dil-Dosti-Dobara-04

Dil Dosti Dobara New Serial On Zee Marathi

पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला ‘दिल दोस्ती दुनियादारी’ (Dil Dosti Duniyadari) ही मालिका येत असून पुन्हा एकदा प्रेक्षकांना आशु, कैवल्य, सुजय, रेश्मा या सर्वांचा गोंधळ, या सर्वांची उडणारी तारांबळ, धमाल पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सिझनचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक विनोद लवेकर यांनी केले होते. मात्र, आता या दुसऱ्या पर्वाच दिग्दर्शन अद्वैत दादरकर करणार असून या अगोदर अद्वैतने ‘मास्टरब्लास्टर’, ‘डोंट वरी बी हॅपी’ यांसारख्या प्रसिद्ध नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.

प्रेक्षकांना ‘दिल दोस्ती दुनियादारी’ (Dil Dosti Duniyadari) या मालिकेच्या पहिल्या सिझनने अक्षरक्ष; वेड लावले होता. आशु, कैवल्य, सुजय, रेश्मा, मीनल आणि अॅनी या सर्वांनी पुर्ण महाराष्ट्राला वेड लावले. गेल्यावर्षी पुन्हा परत येऊ हे आश्वासन देत या मालिकेने प्रेक्षकांची रजा घेतली. मात्र, लवकरच ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या नव्या पर्वात सहा कलाकारांसोबत अजून दोन नवे खास कलाकार पाहायला मिळणार आहे.

पहिल्या पर्वात जसे कथानक माजघरात असायचे तसे नविन पर्वात दोन वेगळे सेटअप असतील. तसेच याआधीची कथा पुढे सरकणार नसून या पर्वाची कथा पुर्णता नविन असणार आहे. या मालिकेतील दिग्दर्शक व लेखक मात्र नविन असणार आहे. अर्थात कव्हर तोच मात्र, मसाला नविन असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here