ऍक्शन आणि रोमान्स चा तडका ५ एप्रिलला थेटर मध्ये झळकणार धुमस . गरुड फिल्म्स प्रस्तुत उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर निर्मित शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ‘ धुमस ‘ चित्रपट अवघ्या दिवसांवर येऊन ठेपलाय .
दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे असणारा धुमस च्या सदाबहार रोमँटिक गाण्यांने ,ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली आहे .
व्यवस्थेची सत्य परिस्थिती सांगत गुलामगिरीतून मुक्त होऊन राजकारणामध्ये पाऊलं ठेवणार आक्रमक व्यक्तिमत्व इंद्रा .ट्रेलरमध्ये डॅशिंग एन्ट्री टाकत धडाकेबाज डायलॉग मारणारा इंद्राने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे .आजच्या परिस्थिती मध्ये असे अनेक इंद्रा समाजामध्ये धडपडतायत त्यांना धूमस एक वेगळी दिशा दाखवणार असा एकंदरीत धुमस च्या विषयावरून समजते .
धनगर समाजाचे आक्रमक महाराष्ट्राचे उगवते आक्रमक युवा नेते सांगली जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्राचे लक्ष वेधणारे गोपीचंद पडळकर यांनी प्रथमच पडद्यावर एन्ट्री मारली असली तरी नवखेपणा कुठेही जाणवत नाही ही जमेची बाजू आहे . मराठीमध्ये अनेकांनी दक्षिणात्य पद्धतीचे चित्रपट बनवले मात्र एकंदरीत ट्रेलर पाहता मराठी सिनेसृष्टीतला धुमस हा अतिशय वेगळ्या धाटणीचा चित्रपट असण्याची श्यक्यता वर्तवली जात आहे . कृतिका गायकवाड च्या नाजूक मनमोहक अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली जातील यात शंका नाही .
धडाकेबाज, धुवा ,राडा ,कल्ला ,विषय खोल,रापचिक ही सगळी विशेषणे कमी पडतील असा अभिनय प्रथमच गोपीचंद पडळकर यांनी धुमस मध्ये केला आहे . असाही नायक असू शकतो ही नवी बाब धुमस च्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला सिद्ध करून दखवण्याचं काम धुमस ह्या चित्रपटाने केले. धुमसचा डायलॉगने ,गाण्यांने सोशिअल मीडिया जाम करत तरुण प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दर्शविला आहे .ट्रॅलर गाण्यांनेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे .
मराठीमधला हा आगळावेगळा प्रयोग म्हणजे धुमस चित्रपट परवा दिवशी ५ एप्रिलला महाराष्ट्राच्या पसंतीस उतरणारच यात शंका नाही .
प्रेक्षकांच्या आत्तापर्यंतच्या प्रतिसादावरून महाराष्ट्रातल्या थेटरवर हाऊस फुल चे बोर्ड लावणार अस म्हंटल तर वावग ठरणार नाही .