बहूचर्चित आणि बहूप्रतिक्षित ‘धुमस’ चित्रपट ५ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे .टिकटॉक ,इन्स्टाग्राम ,युट्युब वर सध्या ‘मन भरून आलाय’ आणि ‘मन बेजार झालया’ ह्या गाण्यांनी धुमाकूळ घालायला सुरवात केलीये .नुकताच ट्रेलर लाँच झाला दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे ‘धुमस’ वाटतोय .राजकीय पडद्यावर बहुजन समाजाच्या अडचणींसाठी मुख्य भूमिका साकारणारे गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर चित्रपटाच्या पडद्यावर नायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत वक्तृत्व कौशल्याने राजकीय वातावरण तापवणारे गोपीचंद पडळकर सध्या चित्रपटाच्या कारणावरून महाराष्ट्रात चर्चेत आहेत .

धुमस चित्रपटाच्या पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या कलाकारांविषयी थोडक्यात जाणून घेऊयात .  प्रत्येक कलाकारांनी पात्रामध्ये जान ओतून आकर्षक कलाकृती निर्माण केली आहे .दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे ग्लॅमर, ऍक्शनच्या तडक्याप्रमाणे धुमस वाटला तर त्याचे श्रेय संपूर्ण कलाकारांना जाते . गोपीचंद पडळकरांनी अन्याया विरुद्ध आवाज उठूवून सामान्य माणसांमध्ये जागरूकता निर्माण करणारा इंद्रा साकरलाय .इंद्रा हे पात्र गोपीचंद पडळकरांच्या आक्रमक व्यक्तिमत्वाच्या जवळ जाते . तसेच इंद्राच्या साथीला व्यवस्थेच्या अन्यायाविरुद्ध इंद्राच्या साथीला आवाज उठवणारे पात्र म्हणजे बाळासाहेब ,समाजकारणाची ,लोकांच्या समस्यांची जाणीव असणारे बाळासाहेब हे पात्रात उत्तमराव जानकारांनी जीव ओतला आहे त्यामुळेच ट्रेलर मध्ये फाईट देणारे बाळासाहेब हे पात्र आकर्षक वाटून चित्रपटाची उत्सुकता वाढवते . शिवाजी दोलताडे यांनी ह्या चित्रपटाच दिग्दर्शन केले आहे .चॅलेंगिंग असल्यामुळं दिग्दर्शकला विशेष मेहनत ह्या चित्रपटाला घ्यावी लागली .
तसेच धुमस चित्रपट पूर्ण होण्यात डी. गोवर्धन (आबा )यांचाही मोलाचा वाटा आहे .आबांनी सहनिर्मात्याची धुरी सांभाळत चित्रपट पूर्ण केला .

तसेच चला हवा येउद्या च्या माध्यमातून तमाम महाराष्ट्राच्या मनात घर करणारे अभिनेते गणेशपुरे यांनीही ‘धुमस’ चित्रपटात हटके भूमिका साकारली आहे .प्रचलित घरातील श्रीमंत नेता, राजकारणात नेहमी वरचढ राहण्याचा प्रयत्न करणारा कपटवृत्तीचा दादासाहेब हे पात्र साकारले आहे ,भारत गणेशपुरेंची प्रत्येक भूमिक प्रत्येकांच्या मनावर अधिराज्य गाजवते त्याप्रमाणेच दादासाहेब हे पात्रही लोकांच्या लक्षात राहील. चित्रपटात आणखी एक पात्र लोकांच्या जरूर लक्षात राहील ते म्हणजे देवा. होत असलेल्या अन्यायाला कंटाळून इंद्रासोबत दोन हात करण्यासाठी तयार असलेला देवा चित्रपटात एक वेगळाच भाव खावून जातो .देवा हे पात्र साकारलय रोहन पाटील .

रोहन पाटील याने देवा हे पात्र अभिनयाच्या जोरावर रोहन पाटीलने आकर्षक वठवले आहे . निळू फुलेंप्रमाणे नकारात्मक भूमिकेने तमाम महाराष्ट्राच्या मनात घर करणारे अनिल नगरकर यांनीही ह्या चित्रपटात काम केले आहे . तसेच विशाल निकम याने अतिशय उत्तम अभिनय करत धुमसची शोभा वाढवली आहे विशालने व्याख्यानाजोग पात्र साकारले आहे . कृतिका गायकवाड हिने प्रज्ञाची भूमिका साकारली आहे सामान्य कुटुंबातली अभ्यासू ,सोज्वळ, प्रेमळ अशी ही प्रज्ञा लोकांच्या पसंतीस उतरेल, साक्षी चौधरी हिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली आहे साक्षीचा अभिनय चित्रपटात गुंतवून ठेवेल,हीना पांचाळ ,कमलाकर सातपुते यांनी ह्या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत .

कार्तिक दोलताडे यांनी सुद्धा धुमस चित्रपटासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे .धुमस चित्रपट पूर्ण होण्यामध्ये editer ,d.o.p . , vfx ,fight master इतर टेक्निकल टीम यांचाही सहभाग आहे .