चंद्रभागा प्रोडक्शन प्रस्तुत जीवन जाधव आणि जितेश मोरे निर्मित दिग्दर्शित प्रकाश पवार यांचा लवकरच ‘बलोच ‘ मराठी सिनेमा येतोय . ह्या सिनेमात खतरनाक अभिनेते प्रवीण तरडे ,राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव कऱ्हाडे आणि त्याचबरोबर हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे प्रकाश पवार यांनी .प्रकाश पवार यांनी यापूर्वी रांजण आणि मिथुन असे सिनेमे महाराष्ट्राला दिले होते .

ह्या सिनेमात खतरनाक अभिनेते प्रवीण तरडे ,राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव कऱ्हाडे हे एकत्र अभिनय करताना महाराष्ट्राला दिसणार आहेत त्याचबरोबर विशाल निकम रोहित आवाळे नव्या दमाचे कलाकारसुद्धा ह्या सिनेमात दिसतील.प्रवीण तरडे ,भाऊराव कऱ्हाडे आणि प्रकाश पवार हे तिहेरी समीकरण लवकरच एक दमदार सिनेमा महाराष्ट्राला देणार यात शंकाच नाही .’बलोच ‘ह्या सिनेमाचं शूटिंग जून पासून राजस्थान भागात सुरू होणार आहे .
मराठ्यांच्या इतिहासातील मोठी जखम म्हणजे पानिपतचा पराभव ,त्या पराभवानंतर आपल्या मावळ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरीत राहावे लागले .त्या गुलामांची शौर्यगाथा म्हणजे ‘बलोच’ सिनेमा अस दिग्दर्शकांनी सांगितले आहे