“धारूर” हे बीड शहरापासून ७५ किलो मीटर अंतरावर असलेल एक प्राचीन व श्रीमंत शहर. आजही गतवैभवाची साक्ष म्हणून प्रचंड मोठे चिरेबंदीवाड़े तग धरून उभे आहेत. सोन्या चांदी ची पेठ म्हणून महाराष्ट्रभर या शहराचा लौकिक आहे जवळपास १२०० वर्षे जुनी ही बाजार पेठ आहे. राष्ट्रकूट, यादव, चालक्य, मोगल या राजवटींशी या शहराचा संबंध होता. दंडकरण्यातून जाताना प्रभू श्री राम काही काळ येथे थांबले होते.
घाटावर वसलेले हे शहर आसल्यामुळे गावाचे आरोग्य चांगले आहे. खवा व सिताफळाची ही महत्वाची बाजारपेठ असून मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद पासून ते हैदराबाद पर्यंत येथील मालाची निर्यात केली जाते. या गावाच्या नावातच त्याची भौगोलिक वैशिष्ट समावलेली आहेत. धारेवरील स्थान म्हणून ‘धारऊर -धारोर-धारुर’ आसे नावे रूढ़ झाली आसवीत.
अहमदनगरच्या निजामशाहीने या गावचे नाव बदलून ‘फतेहाबाद’ असे ठेवले. पण मध्ययुगीन कागद पत्रात “किल्ले धारूर” अशीच नोंद आढळते. मजबूत आणि प्रशस्त किल्ल्यामुळे मोगल काळात या शहराला विशेष महत्व होते. राजा धारसिंहमुळे या गावचे नाव धारूर असे पडले, आशी माहिती अनेक जन सांगतात; पण प्रत्यक्षात तशी नोंद कुठे सापडत नाही.
राष्ट्रकूटकालीन शहर धारूर चे प्राचीनत्व प्रारंभिक, ऐतिहासिक काळापासून दाखवण्यात येते. प्रत्यक्ष शीला शासनात याचे उल्लेख रष्ट्रकुट काळापासून मिळतात. राष्ट्रकूट राजा गोविंद तृतीय (सन ७९३-८१४) यांच्या एका दानपत्रात ‘धारऊर’ आशी नोंद आली आहे. इसवी सनाच्या आठव्या शतकपासून एक ‘विषय विभागाचे’ केंद्र म्हणून या स्थानाला महत्व प्राप्त झाले.
राष्ट्रकुटांचे वेळी येथील नैसर्गिक सुरक्षितिता आणि स्थानचे वैशिष्ट याचा लाभ घेऊन येथे काही धनिकवर्ग, सावकार वर्ग, व्यापारी वर्ग, त्यांच्या सोबत सरदार काही प्रशासकीय अधिकारीही आले. हळू-हळू गावचे नागरात रूपांतर झाले.
उद्याने, जलाशये, भव्य चिरेबंदी वाड़े या मुळे नगराची शोभा वाढली. ५२ तळ आणि १०८ विहिरी या नागरीत होत्या, असे लोक कथेतून सांगितले जाते. राष्ट्रकुटांनी दिलेल्या उदार आश्रयातून येथे एक वैभवशाली परंपरा जोपासली गेली. या काळात मराठवाड्यात जी केंद्रे पुठे आली त्यात एलापुर (वेरूळ), लत्तलुर (लातूर), कंधारपुर (कंधार ), या केंद्राचा विकास झाला.
यात धारूर हे अग्रणी केंद्र होते. यादवांच्या काळात एक देश विभागाचे केंद्र म्हणून या स्थानाला महत्त्व होते. या विषयीची नोंद असनारा शिलालेख आंबाजोगाई येथे आहे. येथील सकलेश्वर देवस्थानच्या निर्मिति साठी दिलेल्या दानपत्रात या स्थानाची नोंद सिंघन यादवाचा सेनापती खोलेश्वर (शके ११३२ते ११६९) हा करतो. या दान लेखात ‘प्रसाद: सकलेश्वरस्य रचितो धारोर देश’ अशी नोंद आहे. बहमनी कालखंड सन १२९४ मधे अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिणेस प्रथम आक्रमण केले.
सन १३१७ मधे मुबारक शहाने देवगिरीचे यादव राज्य नष्ट केले. येथे इस्लामिक सत्तेची प्रतिष्ठापाना केली. अल्प काळ येथे ख़िलजी महमद तुघलकाची सत्ता होती. लवकरच दौलताबादाचा ‘हसन गंगू’ उर्फ़ ‘जाफर खान’ याने सन १३४७ मधे स्वतंत्र राज्याची निर्मिति केली. याने स्थापन केलेल्या राज्यास ‘बहमनी राज्य’ आसे म्हणतात (सन १३४७-१५३८).
याचे एकूण १८ सुलतान झाले पुढे या राज्याची विभागनी होऊन निजामशाही, आदिलशाही, इमादशाही, कुतुबशाही, बरीदशाही आश्या शाह्या निर्माण झाल्या. इतिहासाची साधने धारूरच्या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे यादवांच्या नंतर निर्माण झालेले बहमनी राज्य व त्यानंतर च्या दक्खनी सलतनीच्या काळातील बदलत्या रणनीतीच्या संदर्भात या स्थानाला विशेष महत्व प्राप्त झाले.
बालाघाटाचा प्रदेश ताब्यात ठेवण्यासाठी धारूरवर सत्ता असने आवश्यक मानले गेले. उत्तर व बहामनी काळामधे विजापुरची आदिलशाही (१४९० -१६८६) व आहमदनगरची निजामशाही (१४९०-१६३६) यांच्यात येथे सत्ता संघर्ष झाला. त्याचे सविस्तार वर्णन तत्कालीन इतिहासकरानी करुन ठेवले आहे. या स्थानविषयी नोंद असलेले एक नाने अलीकडे उपलब्ध झाले.
श्रीगोंदा तालुक्यातील बहादुरगढ़ येथे मिळालेल्या एका तांब्याच्या नाण्यावर ‘१०९हुमायुन ब-हमनी’ तर दुसऱ्या बाजूस ‘राजा धारूर’ अशी अक्षरे फार्शी भाषेत कोरली आहेत. स्थानिक इतिहासवार प्रकाश टाकणारे काही शिलालेख गावात आणि जिल्ह्यात उपलब्ध झाले आहेत.
या स्थानाची नोंद ‘बुसातीन-उस-सलातीन’ या फ़क़ीर महमद झुबेरिलिखित ग्रंथात आहे. मोगल दरबाराची कागदपत्रे तसेच मराठकालिन कागदपत्रातून या स्थानविषयी नोंद आली आहे. धारूर मध्ये इतिहासाची विपुल साधने आज उपलब्ध आहेत. असे असले तरी ही साधने विखुरलेली असून सर्वच आभ्यासलेली नाहीत. धारूर येथे एकेकाळी टकसाळ होती, त्यातपडली गेलेली नाणी हे एक महत्वाचे साधन ठरते.
येथे नांदलेल्या विविध राजवंशाच्या संदर्भात नोंदविलेल्या बखरी, हस्तलिखिते, व कागदपत्रे यांचा स्वतंत्र अभ्यास करावा लागतो. येथे संशोधकांनी संपादित व प्रकाशित केकेल्या साधनांचाच आधार घेतला आहे. येथे नोंदवली आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक माहिती या स्थानाच्या संदर्भात विविध ठिकाणी उपलब्ध आहे.
धारूरचा महादुर्ग विजयपुरच्या आदिलशाहीचा एक सिपहसलार किश्वरखान याने पहिला आली आदिलशाह (सन १५५८ एप्रिल ते १५८० ) यांच्या काळात धारूर चा किल्ला बांधला. सभोवतालचे भौगोलिक महत्व लक्षात घेऊन येथे हा महादुर्ग निर्माण केला गेला होता.
कोरड्या पठारावर बालाघाट डोंगराच्या रांगेमधे खिंडी व त्यातून जाणारे व्यापारी मार्ग यांच्या मोक्यावर लष्करीदृष्टीने हा गड उभारला होता. तो पुन्हा उभारने योग्य ठरणार होते या दृष्टीने किश्वरखान याने जो प्रस्ताव मांडला त्याची सविस्तर नोंद पर्शियन साधनातून उपलब्ध होते.