आज तुमच्यासमोर जगातल्या एका गुढ असलेल्या सरोवराबद्दलच्या गोष्टी घेऊन येणार आहोत. लोणार सरोवर मुळत: महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात येतं. जगातल्या दोन सर्वोत्तम मोठ्या उल्कापात होऊन झालेल्या सरोवरांपैकी लोणार हे दुसरं मोठ सरोवर आहे, तर आशिया खंडातील हे एकमेव मोठ सरोवर मानलं जातं.

“लोणार सरोवर” हे नाव आता बहुतांशी आपल्याला ज्ञात असलं तरी त्याबाबतच्या बऱ्याच न उलगडू शकलेल्या गोष्टी आपल्यासाठी नेहमी कुतूहलाचा विषय राहिल्या आहेत. बेसाल्ट खडकात आजवर असलेलं एकमेव सर्वाधिक मोठ विवर म्हणजे, लोणार सरोवर.

असं मानल जातं की, सरासरी इसवीसनापूर्वी 52 ते 58 हजार वर्षे आधी झाली असण्याची शक्यता आहे. सरोवराचा व्यास जवळपास 1.8 किमी एवढा आहे. सरोवराच्या वयाच्या नोंद जवळपास 5 लक्ष वर्षे अधिक केली गेली आहे. लोणार सरोवर मुळात धुमकेतूच्या पृथ्वीवर झालेल्या आघातामुळे तयार झालेले सरोवर आहे.

जगातल्या अनेक मोठ्या संशोधन करणाऱ्या संस्था आजही लोणार सरोवराच्या विविधांगी बाबींवर प्रकाश टाकून अभ्यास करतात. लोणार सरोवर येथे ‘प्लँगिओक्लेज’ नावाचे खनिज सापडले आहे. हे खनिज नंतर ‘मास्केलिनाइट’ मध्ये रूपांतरित झाले आहे, किंवा त्याच्यामध्ये प्लेनर डिफॉर्मेशन होण्याचं वैशिष्ट्य आहे.

जे की फक्त अतिवेगवान वस्तूच्या आघातामुळेच होऊ शकते. त्यामुळे सरोवराची निर्मिती उल्केमुळे झाली यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या सरोवराचा आकार अंडाकृती आहे. म्हणजेच पृथ्वीच्या 34 ते 38 अंश कोनात येऊन ही उल्का येथे आदळली असावी.

लोणार या सरोवराबद्दल खरी कुतूहलाची बाब म्हणजे याचा इतिहासात उल्लेख आढळतो तो पौराणिक कथांशी. याखेरिज बऱ्याच इतर पुस्तकांमधेही लोणार सरोवराचा उल्लेख आहे. लोणार सरोवर त्याच्या एका महत्वपूर्ण भूमिकेसाठी विचारात घेतलं जातं ती म्हणजे, या सरोवरातल्या पाण्याचे गुणधर्म.

इथल्या पाण्यात क्षार अधिक प्रमाणात आढळून तर येतातच शिवाय हे पाणी पूर्णत: अल्कधर्मी आहे. म्हणजेच या पाण्यात जनजिवण असणं शक्यच नाही; परंतु नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे की, या सरोवरात असे काही जिवाश्म सापडतात जे जगातल्या इतर कुठल्याही वातावरणात आढळून येऊ शकत नाहीत.

निश्चितच ही अतुलनीय व अचंबित करणारी गोष्ट मानावी लागेल. येथील पाणी पिण्यायोग्य अजीबात नसलं तरीदेखील या पाण्यात त्वचारोगांना नष्ट करण्याची गुणधर्म आढळलेली पहायला मिळाली आहेत. या पाण्याच्या वेगळेपणामुळे जवळच्या परिसरात विविध प्रकारच्या औषधी वनस्पती सापडतात.

लोणार सरोवराच्या अवतीभवती जवळपास बरीच पुरातण मंदिर पहायला मिळतील. यातली 12 ते 15 मंदिरे ही या विवराच्याच परिसरात स्थित आहेत. या मंदिरांमधील कोरीव कामे ही अत्यंत सुरेख अशी पहायला मिळतात.

लोणार सरोवराच्या भोवती बऱ्याच विविध पक्षांची सोबतच काही प्राण्यांचीदेखील गुजरण असलेली पहायला मिळते. इथल्या वातावरणात एक प्रकारची वेगळी चुनूक लाभत असल्याने बऱ्याच पक्ष्यांचा यासभोवताली वेढा कायम असलेला पहायला मिळतो.