एक मराठी मालिका गेली दोनचार वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्या मधील सगळीच पात्र खूप व्हायरल झालेली आहेत. पण त्यातही एक वाहिणीसाहेब म्हणून पात्र ते खूप लोकप्रिय झाले होते. तुझ्यात जीव रंगला ही ती मालिका.

त्यामधील वहिनी चं पात्र करणारी धनश्री काडगावकरही सध्या करीना सारखीच बेबी बंप एन्जॉय करतेय. ती सध्या गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात आहे.

तिचे काही फोटो सोशल मीडियावर फार व्हायरल झाले आहेत. चला सविस्तर माहिती सोबत फोटो पाहून घेऊयात.

 

तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत वहिनीसाहेब ही भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगांवकर.

उत्तम अभिनय आणि बोलण्यातील ठसकेबाजपणामुळे धनश्री विशेष लोकप्रिय झाली. त्यामुळेच आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं

धनश्री लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सध्या ती तिचा प्र’ग्नं’सी काळ एन्जॉय करत आहे.धनश्रीने आतापर्यंत तिच्या बेबीबंपसोबत बऱ्याचदा फोटोशूट केलं आहे. मात्र, पुन्हा एकदा एक नवीन फोटोशूट करुन ती चर्चेत आली आहे.

मकरसंक्रांतीनिमित्त धनश्रीने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. संक्रांत स्पेशल फोटोशूटमध्ये तिने वेस्टर्न लूकमध्येदेखील काही फोटो शेअर केले आहेत.

विशेष म्हणजे या फोटोंमधून तिच्या चेहऱ्यावरील आई होण्याचा आनंद पूर्णपणे दिसून येत आहे.

धनश्री ला तिच्या पुढील वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.कारण आई झाल्यानंतर पुन्हा मालिकेत लोकप्रिय काम साकार करताना पाहणं हे तिच्या साऱ्या चाहत्यांना वाटत आहे.