सरस्वती मालिकेमध्ये नुकतेच नवे वळण आले आहे. सरस्वतीच्या मोठ्या
मालकांनी म्हणजेच राघवने देविकाशी लग्न केले आहे. या प्रकारामुळे सरस्वती पुढे खूप मोठा प्रश्न उभा
राहिला आहे कि आता पुढे काय करावे ? सरस्वती आता काय करेल ? देविका आणि राघवचे नाते
स्वीकारेल ? राघवची कशी समजूत काढेल ? विद्युल राघवला सरस्वती पासून दूर ठेवण्यासाठी आता
कुठली खेळी रचेल ? हे सगळे बघणे रंजक ठरणार आहे. देविका म्हणजेच सगळ्यांची लाडकी जुई गडकरी
हि लग्नानंतरच्या तिच्या साडी मध्ये सोज्वळ आणि खूपच सुंदर दिसते आहे. लाल साडी, गळ्यात
मंगळसूत्र, दागिने यामुळे तिचं सौंदर्य अजूनच उठून दिसते आहे.
राघव आणि देविकाच्या लग्नानंतर मालिकेमध्ये कुठले नवे वळण येईल …
कारण देविकाला अजूनही माहिती नाही कि सरस्वतीच राघवची पहिली पत्नी
आहे. सरस्वती राघवच्या मनातील गैरसमज कसा दूर करेल हे जाणून
घेण्यासाठी बघत रहा सरस्वती कलर्स मराठीवर.