‘वर खाली दोन पाय’ या प्रायोगिक नाटकाचा प्रीमियर सोहळा संपन्न 

‘पुरुष’ या नाटकाचा संदर्भ घेऊन आजच्या भीषण बलात्कारी प्रवृत्तीवर भाष्य करणारे ‘वर खाली दोन पाय’ हे प्रायोगिक नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरत आहे. प्रायोगिक नाट्यवैभवातील ह्या प्रसिद्ध आणि विचारवंतांनी गौरविलेल्या नाट्याचे, बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात मोठ्या दिमाखात पुनर्सादरीकरण करण्यात आले. डिजिटल डेटोक्स प्रस्तुत आणि रंगालय निर्मित या रंगनाट्याच्या प्रीमियर सोहळ्यात हिंदी आणि मराठीच्या दिग्गज कलावंतांची मांदियाळी पाहायला मिळाली.
हृषीकेश कोळी लिखित आणि दिग्दर्शित ‘वर खाली दोन पाय’ या नाटकाच्या ‘रेड कार्पेट’वर पंढरीनाथ कांबळे, प्रसाद जवादे, विनीत शर्मा, प्रकाश कुंटे, गायत्री सोहम, मनीषा केळकर आणि इतर दिग्गज मराठी तसेच हिंदी कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. विशेष म्हणजे एका प्रायोगिक नाटकाचा प्रीमियर सोहळा होण्याची हि पहिलीच वेळ असून, व्यावसायिक नाटकाच्या धर्तीवर प्रायोगिक नाटकांची वाढत असलेली व्याप्ती आणि प्रसिद्धीचा टक्का उंचावत असल्याचे दिसून येते. चैतन्य अकोलकर प्रस्तुत या नाटकाचे, वैशाली राहुल भोसले, सुगंधा सुहास कांबळे यांनी निर्मिती केली असून, प्रवीण कांबळे यांनी सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे.
Var Khali Do Paay Marathi Natak Photo

Ritwik Kendre