भारतीय सिनेमाक्षेत्रात आजवर अनेक सिनेमांनी विविध बाबींमधून नानाविध प्रकारचे किर्तीमान स्थापित केल्याचे पहायला मिळाले. आणि अशाच काही ठराविक सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणलं तर तो दंगल. दंगल या चित्रपटाने केवळ बॉलिवूडमधेच नाही तर इतर बाहेरच्या देशांमधेदेखील बरीच किर्ती प्रस्थापित केली आणि अक्षरश: अख्ख जग गाजवलं. दंगल हा चित्रपट बॉलिवूडच्या आजवर तयार झालेल्या मोठ्या आणि जबरदस्त सिनेमांपैकी एक होता.
या चित्रपटातील प्रसंग, संवाद, अभिनय आणि दिग्दर्शन हे सारच फार उत्तम झाल्याचं पहायला मिळालं होतं. आज आम्ही दंगल या सिनेमाचा वारंवार उल्लेख करत आहोत; याचं खास कारण म्हणजे, या सिनेमातून एका भुमिकेतून गाजलेली अभिनेत्री आज अगदी वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचल्यानंतर ती कशी आहे हे आपण थोडसं जाणून घेणार आहोत.
गीता फोगटची भुमिका साकारणाऱ्या त्या अभिनेत्रीची इथे आज चर्चा केली जाणार आहे. तुम्हाला माहितच आहे की, फोगट कुटुंबातील वडील आणि त्यांच्या जिद्दी मुलींवर हा सिनेमा बनला होता ज्याचं कथानक हे खऱ्या आयुष्यावर आधारित होतं. अर्थातचं दंगल या सिनेमात झायराने गीता फोगटची भुमिका साकारली होती.
झायराच्या अदाकारीवर तमाम इतर देशदेखील फिदा झाले होते. कारण दंगल हा सिनेमा केवळ भारत नाही तर जगभरात अव्वल स्थानांपैकी एक ठरण्याच्या यादीत जाऊन बसला होता. अगदी हॉलिवूडमधील कैक सुपरस्टार सेलीब्रेटींनीदेखील झायराबद्दल यावेळी कौतुकाची थाप मारली होती.झायरा वसिम हिच्याबद्दल बोलायचं म्हटलंच तर लोकांच्या काही ठराविक टिकांमुळे तिने गेल्या काही काळापासून सिनेसृष्टीपासून चार हात लांब ठेवल्याचे पहायला मिळतं आहेत.
इतकचं नाही तर सौंदर्याच्या आणि आपल्या अभिनयातील खुबीच्या जोरावर आज झायराकडे एकापाठोपाठ एक उत्कृष्ट दर्जाचे सिनेमे नक्कीच आले असते. परंतु तिने तिच्यावर काही ठराविक लोकांमधून तिच्यावर उठणाऱ्या टिकेला मनावर घेतलं आणि सिनेसृष्टीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अचानक होणं साहजिकचं सर्वांसाठी धक्कादायक बाब होती.
खर सांगायच म्हणजे, दंगल सिनेमाच्या नंतर तिने आमिर खानसोबत सिक्रेट सुपरस्टार या सिनेमात जे काम केलं होतं ते अगदीच तुफान लोकप्रिय आणि वाखाणण्याजोग झालं होतं. भारतीय बॉक्स ऑफिसवर जरी सिक्रेट सुपरस्टार हिट जाऊ शकला नव्हता तरी चायनासारख्या देशात सिनेमाने चक्क शतकीय कोटींच्या घरात व्यवसाय केला होता. झायराच्या दंगल सिनेमानंतरच तसं तिला जाहिराती आणि इतर गोष्टींच्या प्रोमोशन करता ऑफर्स मिळू लागल्या होत्या.
परंतु तिने त्या केल्या नाहीत. आज जरी तिने सिनेसृष्टी सोडली असली तरी ती भविष्यात याद पदार्पण करेल अशी तिच्या चाहत्यांना थोडीशी ग्वाही नक्कीच आहे. झायराच्या निर्णयावर अनेकांच्या मते एकदा आमिरने तिला समजावणं गरजेच होतं. परंतु ती लहान असल्याने तिने आधी काही गोष्टी स्वत: अनुभवल्या पाहिजेत, नंतर तिने निर्णय घेतला पाहिजे; तिची तिने ही अशी भुमिका आधीच मांडली होती. याखेरीज तिने प्रसारमाध्यमांना तिचे फोटोज सोशल मीडियावरून काढून टाकण्याची विनंतीही केल्याची पहायला मिळते. पंरतु त्यानंतर ती स्वत:च सोशल मीडियावर आली आहे. तिने तिच्यावरील टिकेला आता हळूहळू उत्तर द्यायचं ठरवलं आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!