comedychi-bullet-train-kavita-lad-special




Comedychi Bullet Train | Kavita Lad special

कलर्स मराठीवरील कॉमेडची बुलेट ट्रेनमध्ये कविता लाड….

कॉमेडची बुलेट ट्रेनमध्ये २० आणि २१ ऑक्टोबरला रात्री ९.०० वाजता

महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम कॉमेडची बुलेट ट्रेनमध्ये दर आठवड्यात प्रेक्षकांना
वेगवेगळ्या अभिनेत्यांना बघायला मिळत. मागील आठवड्यात प्रेक्षकांना अरुण नलावडे आणि स्वाति
चिटणीस यांना बघायला मिळाले, तसेच त्यांनी केलेली स्कीटस देखील प्रेक्षकांना खास आवडली.

कॉमेडची
बुलेट ट्रेनमधील विनोद वीरांबरोबर या आठवड्यात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे महाराष्ट्राच्या लाडक्या
अभिनेत्रीला म्हणजेच कविता लाड यांना. कविता लाड यांनी अवघ्या महाराष्ट्राचे मन त्यांच्या अभिनयाने
जिंकले आहेच पण आता त्यांच्यातील विनोद कौशल्यदेखील प्रेक्षकांना कलर्स मराठीद्वारे टेलीव्हिजनवर
बघायला मिळणार आहे.

kavita-lad-in-comedychi-bullet-train




Comedychi Bullet Train Colors Marathi

कविता लाड यांनी रंगमंच तर गाजवला आहेच मग ते एका लग्नाची गोष्ट असो वा चार दिवस प्रेमाचे
असो पण कॉमेडची बुलेट ट्रेनमध्ये कविता लाड यांनी एक स्कीट देखील सादर केले आणि विनोदवीरांना एक
अविस्मरणीय आणि आगळावेगळा अनुभव देखील दिला.

त्यांच्या विनोद्कौश्ल्याने विनोदविरांना हसण्यास
भाग पाडले. इतकेच नव्हे तर सोनाली कुलकर्णी आणि महेश कोठारे यांना देखील त्यांचे हास्य थांबवता
आले नाही. त्यामुळी हा अनुभव प्रेक्षकांसाठी नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे.
तेंव्हा बघायला विसरू नका कॉमेडची बुलेट ट्रेन हसण्याचे आरक्षण – २० आणि २१ ऑक्टोबरला रात्री ९.००
वाजता फक्त कलर्स मराठीवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here