colors-marathi-rockstar-swapnil-bandodkar-bela-shende-live-in-concert




Colors Marathi Rockstar – Swapnil – Bela live in concert.

कलर्स मराठीवर स्वप्नील – बेलाबरोबर संगीतमय संध्याकाळ

कलर्स मराठी Colors Marathi Rockstar  स्वप्नील – बेला Live In concert २३ ऑक्टोबरला संध्याकाळी ७.०० वाजता

कलर्स मराठीवर रंगणार एक संगीतमय संध्याकाळ. २३ ऑक्टोबरला कलर्स
मराठी Rockstar स्वप्नील – बेला Live In concert संध्याकाळी ७.०० वाजता कलर्स मराठीवर बघायला
मिळणार आहे.

महाराष्ट्राच्या तमाम राधांना आपल्या गाण्यांनी आणि गोड आवाजानी वेड लावलेला गायक
स्वप्नील बांदोडकर आणि महाराष्ट्राची लाडकी गायिका बेला शेंडे येत आहे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या
गाण्याने मंत्रमुग्ध करण्यासाठी कलर्स मराठीवरील सुरेल संगीतमय कार्यक्रमामध्ये.

लोकांच्या मनाचा ठाव
घेणारी गाणी, हजारो लोकांनी भरलेले मैदान, टाळ्यांचा कडकडाट, आणि ३२ वाद्यांच्या ताफ्याने सजलेला
रंगमंच आणि साथेला गाण्यातले दोन धृवतारे स्वप्नील – बेला त्यामुळे हि संगीतमय संध्याकाळ
प्रेक्षकांसाठी एक मेजवानी ठरणार हे नक्की.

स्वप्नील आणि बेला यांच्या संगीत कारकिर्दीतील काही
निवडक आणि लोकप्रिय अश्या गाण्यांचा सुरेल नजराणा प्रेक्षकांसाठी कलर्स मराठी घेऊन येत आहे,
ज्यामध्ये प्रेक्षकांना निखळ संगीताचा आनंद मिळणार आहे.

swapnil-bandodkar-bela-shende-live-in




स्वप्नील बांदोडकर या कार्यक्रमाविषयी म्हणाला, “आजपर्यंत मी आणि बेलाने असंख्य रोमँटिक गाणी
गायली जी प्रेक्षकांच्या खास पंसतीस देखील उतरली.

माझी आणि बेलाची गाण्यातील केमेस्ट्री हि
स्टुडीओच्या चार भिंतीपर्यंतच सीमित होती, पण कलर्स मराठीमुळे ती आज संपूर्ण महाराष्ट्राला ऐकायला
मिळणार आहे. या कार्यक्रमामध्ये आम्ही तब्बल ३२ वाद्यांचा ताफा वापरला आहे आणि या सगळ्या

वाद्यांना न्याय द्यावा म्हणून मी “तुम जो मिल गये हो” हे गाण गायल आहे. हि संगीतमय मेजवानी
फक्त प्रेक्षकांसाठी नसून ती बेला आणि माझ्यासाठी देखील आहे. मला असा विश्वास आहे कि प्रेक्षकांना
हा कार्यक्रम नक्की आवडेल”.
स्वप्नील आणि बेला या कार्यक्रमाद्वारे पहिल्यांदाच एकत्र लाइव्ह गाणार आहेत. या दोघांनीहि या आधी
अनेक गाणी एकत्र गाऊन लोकांची दाद मिळवली आहे. या कार्यक्रमाद्वारे देखील स्वप्नील आणि बेलाने
त्यांची अनेक सुप्रसिध्द गाणी लाईव्ह गाऊन जमलेल्या प्रेक्षकांना खुश केले.

स्वप्नीलने त्याची काही
निवडक गाणी गायली ज्यामध्ये राधा हि बावरी, का श्वास हा, गालावर खळी, पोरी तू कमाल तर
बेलाने राती अर्ध्या राती, सावर रे, अप्सरा आली, आणि मन मोहना अशी गाणी गाउन कार्यक्रमाची रंगत
वाढवली. तर स्वप्नील – बेलाने मिळून का कळेना, ओल्या सांजवेळी आणि मला वेड लागले अशी गाणी
गाऊन प्रेक्षकांना हि सगळी सुप्रसिध्द गाणी पुन्हाएकदा ऐकण्याची संधी मिळाली.

swapnil-bandodkar-bela-shende

 

बेला शेंडे या कार्यक्रमाविषयी बोलताना म्हणाली, “स्वप्नील आणि मी याआधी बरंच काम केले आहे.
कलर्स मराठीमुळे आम्हाला एकत्र लाईव्ह गाण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली. कार्यक्रमाविषयी सांगायचं
झाल तर, हा कार्यक्रम म्हणजे संगीत प्रेमींसाठी एक उत्तम संधी असणार आहे अस मला वाटत, कारण
त्यांना या कार्यक्रमाद्वारे निखळ संगीताचा आनंद मिळणार आहे.

तब्बल ३२ वाद्यांचा ताफा वापरला
आहे ज्यामध्ये अनेक वाद्ये आम्ही पहिल्यांदाच वापरली आहेत. मी या कार्यक्रमाबद्दल खूपच उत्सुक
आहे. मला आशा आहे कि रसिक प्रेक्षकांनादेखील हा कार्यक्रम नक्कीच आवडेल.”
तेंव्हा बघायला विसरू नका कलर्स मराठी Rockstar स्वप्नील – बेला Live In concert २३
ऑक्टोबरला फक्त कलर्स मराठीवर संध्या. ७.०० वाजता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here