सगळीकडे सध्या होळीची तयारी सुरू झाली आहे. होळीला वाईटावर चांगल्याच गोष्टीचा विजय होतो असे म्हंटले जाते. कलर्स मराठीवरील मालिकांमध्ये देखील होळी मोठ्या जल्लोषात साजरी होणार आहे. आपल्या लोकप्रिय मालिका राजा रानीची गं जोडी, जीव झाला येडापिसा आणि स्वामिनि मालिकेमध्ये होळी विशेष भाग येत्या आठवड्यामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. मालिकांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. स्वामिनी आणि बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेमध्ये होळी पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाणार आहे. तर राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजु – रणजीत आणि जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये सिध्दी शिवाची लग्नानंतरची पहिली होळी असणार आहे… या आठवड्यात कलर्स मराठीवर प्रेमाच्या रंगाची उधळण होणार आहे. तेंव्हा नक्की बघा राजा रानीची गं जोडी, जीव झाला येडापिसा मालिकांचे विशेष भाग येत्या आठवड्यामध्ये सोम ते शनि संध्या ७.०० वाजल्यापासून आणि स्वामिनी मालिकेचा एका तासाचा विशेष भाग रविवार ८ मार्च संध्या ७.०० वा आपल्या कलर्स मराठीवर.
स्वामिनी मालिकेमध्ये रमा आणि माधवरावांचा लग्नानंतरचा हा सण शनिवारवाड्यावर उत्साहात साजरा होणार आहे… श्रीमंतांच्या सांगण्यावरुन होलिकोत्सवाची जय्यत तयारी होणार आहे…आणि याचनिमित्ताने पेशव्यांच्या आदेशानुसार जनतेमध्ये लोकोपयोगी गोष्टीचे वाटप करण्यात येणार आहे तर काही बाबींचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. पुण्याहून देवदर्शना करीता विठ्ठलवाडी, आळंदी, थेऊर या ठिकाणी भाविकांचे वारंवार जाणे होते. या मार्गावर वाटा रुंद व साफ आहेत, पण सावली नाही… म्हणूनच जनतेच्या सुविधेसाठी या मार्गावर दुतर्फा वड आणि पिंपळाची झाडे लावण्यात येण्याची आणि ठिकठीकाणी विहिरी खोदून पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे… इतकेच नव्हे तर, दरवर्षी फळझाडे लावण्यात यावी असे देखील सांगण्यात आले आहे. याचसोबत वैद्यशाळा आणि व्यापार उदीमसाठी नवीन पेठा देखील वसविण्यात येणार आहे. हे सगळ होत असतानाच गोपिकाबाईंच्या म्हणण्यानुसार प्रजेकडुन मिळणारा पेशव्यांच्या सुनबाईंचा मान हिरावून नव्या सुनबाईंना म्हणजेच आनंदीबाईंना दिला जाणार का ? याचा देखील खुलासा महा रविवारच्या भागामध्ये होणार आहे.
राजा रानीची गं जोडी आणि जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये होळी मोठ्या जल्लोषात साजरी होणार आहे… आत्याबाईच्या हस्ते होलिका दहन होणार आहे. या होळीला शिवा आणि सिध्दी, संजु – रणजीत एकत्र होळीची पुजा करणार आहेत. बघूया मालिकेमध्ये पुढे काय घडणार येत्या आठवड्यामध्ये सोम ते शनि संध्या ७.०० वाजल्यापासून आपल्या कलर्स मराठीवर.