बॉलिवुडमधील सिनेजगतात अनेक जोड्या एकत्र येतात, काही जन्मभराचे जणू ऋणानुबंध एकत्र घेऊन जगतात तर काहींच्या गोष्टी अर्ध्यावर सुटून जातात. परंतु इतर गोष्टी काहीही असल्या तरी सध्याच्या घडीला सिनेसृष्टीतल्या या जगतात एक थोडीशी विचित्रच गोष्ट घ’ड’ल्या’ची पहायला मिळाली आहे. ही गोष्ट अर्थातचं एका बॉलिवुडमधील अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या लग्नसोहळ्याची आहे.
तुम्ही आजवर कधीच अशी गोष्ट पाहिली नसेल की एखादा नवरा मुलगा त्याच्या लग्नात रडला. शक्यतो आपल्याकडे मुलगी तिच्या सासरी जाण्याच्या, घरच्यांना दुरावल्याच्या भावनांमुळे रडत असते. पण इथे तर प्र’क’र’ण थोडसं वेगळंच घडलं. आणि जे घडलं ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं झालं. अर्थातच अशा काही अजब गोष्टी कानांवर पडल्या अथवा पहायला मिळाल्या तर त्यांची वाणवा ही उठणारच.
तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा अभिनेता नेमका कोण आहे? आणि त्याच असं लग्न झालंतरी कोणासोबत? तर मुळात हा अभिनेता इतर कोणी नसून त्याच्या विनोदी कलाकृतीमुळे प्रसिद्धी लाभलेला संकेत भोसले हा आहे. अर्थातचं कॉमेडियन आणि सोबतच डॉक्टरदेखील असलेला संकेत भोसले आता लग्नबंधनात अडकला आहे.
द कपील शर्मा या कार्यक्रमात काम करणाऱ्या सुगंधा मिश्रा या अभिनेत्रीशी त्याने लग्नगाठ बांधली आहे. सुगंधा मिश्रा हिला द कपील शर्मा कार्यक्रमाने चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली यात काहीच शंका नाही. दुसरीकडे संकेत भोसले जे मुन्नाभाई स्टाईलने विनोद निर्मिती करतो त्याने तो चांगलाच लोकप्रिय झालेला आहे. आणि मुळात या जोडीच्या लग्नात नेमकं काय घडलं? हे आता आपण सविस्तर जाणून घेऊयात.
अभिनेत्री सुगंधा मिश्रा व अभिनेता संकेत भोसले यांच्या लग्न झाल्याच्या नंतर सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे व्हिडिओ व्हायरलं होताना पहायला मिळतं होते. आणि याच व्हिडिओंच्या दरम्यान एका व्हिडिओमधे संकेत भोसलेला रडू आल्याचं स्पष्ट दिसत होतं. संकेत भोसले खरतरं या प्रसंगी खुप हळवा आणि भावूक होऊन गेल्याच पहायला मिळतं. आणि शिवाय सुंगधा मिश्रा त्याचं सांत्वन करताना आणि त्याला धीर देताना पहायला मिळतं आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून जसे दोघांचे फोटो आणि व्हिडिओज व्हायरलं होत राहतात, तशेच इतरही व्हिडिओ व्हायरलं होताना पहायला मिळतात. परंतु यावेळी हा व्हिडीओ इतर माध्यमातून नाही तर चक्क खुद्द स्वत: संकेतची पत्नी सुगंधानेच शेअर केल्याच दिसून येत आहे. व्हिडिओमधे संकेत सुगंधाबद्दल स्वत:च प्रेम व्यक्त करताना पहायला मिळतो आहे.
तो स्वत:ला खुश मानतो की, सुगंधासारखी मुलगी त्याच्या आयुष्यात आली. तो म्हणतो की, “सुगंधा अगदी खतरनाक आहे, तिच्यासारखं इतर मुलींनी असावं, तुम्ही अशा मुलीच्या नक्कीच प्रेमात पडालं, मला अजून तिच्याबद्दल खास शब्दच सुचत नाहीयेत…” असं म्हणतं संकेतच्या डोळ्यातून थेट अश्रूंचा बांध फुटल्याचा पहायला मिळाला.
सुगंधाने त्याला धीर देत, त्याचे अश्रू पुसत त्याला सावरल्याच पहायला मिळतं. गेल्या काही दिवसांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. आणि शेवटी एकदाचं दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचं ठरवत या वर्षी लग्नगाठ बांधली. सुगंधा आणि संकेत दोघेही अगधी आज टिव्ही माध्यमातील लोकप्रिय कलाकार आहेत. निश्चितच दोघांच्या भविष्याची वाटचाल अगदी चांगल्या प्रकारे होईल, याचचं समाधान.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!