बॉलीवुडमधील सिनेसृष्टीत कधी काय प्रकाशझोतात येईल याचा नेम लावता येणं थोडसं कठीणचं असतं. मुळात सिनेसृष्टीत जितक्या प्रमाणात सेलीब्रेटी कलाकारांना प्रसिद्धी लाभलेली असते अगदी तितक्याच प्रमाणात त्यांच फॅशन, त्यांची डिझाईन्सची निवड, त्यांचे कपडे, त्यांच एखादं कलेक्शन याकडे अनेकांच लक्ष लागून राहिलेलं आपल्याला पहायला मिळतं.

वारंवार त्यांच्या एक ना अनेक अशा गोष्टी प्रकाशझोतात येत असतात. आणि त्यातही आजच्या घडली जर सोशल मीडिया हातात आहे, म्हटल्यावर अशा विविध गोष्टी अगदी वाऱ्याच्या वेगाने तमाम देशभर पसरायला फारसा वेळ लागत नाही. तर सध्याच्या घडीला अशीच एक गोष्ट अभिनेत्री आलिया भट आणि दिशा पटानी यांच्यासोबत पहायला मिळाली आहे.

तर मुळात या दोन्ही अभिनेत्री नुकत्याच परदेशातून भारतात परतल्या आहेत. आणि विमानतळावरून त्या आपापल्या घरी जाताना त्यांच्या काही अदा फोटोंमधे टिपल्या गेल्या आहेत. विशेष बाब म्हणजे हे फोटो केवळ अभिनेत्र्या भारतात आल्याने प्रसिद्ध नाही झाले तर त्यांच्या अंगावर जे कपडे होते, त्या डिझाईन आणि तशा प्रकारच्या कपड्यांची चर्चा सोशल मीडियावर रंगल्याची पहायला मिळते आहे.

आलिया भट तिच्या अंगावर परिधान केलेल्या शॉर्ट जिन्सच्या पेहरावामुळे भलतीच क्यूट दिसत होती. त्यामुळे तिच्या अनेक चाहत्यांना आता जणू क्युट लुकसाठी अशाच काहीशा डिझाईनचा पेहराव परिधान करण्याची उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे केवळ आलियाच नाही तर ही बात दिशा पटानी या अभिनेत्रीच्या बाबतीतही घडत असल्याची पहायला मिळते आहे.

दिशा आणि आलिया परदेशातून नुकत्याच मुंबई विमानतळावर परतल्या असताना तिथेच त्यांचे काही फोटोज काढण्यात आले. आणि ते आता फॅशन ट्रेंड म्हणून व्हायरलंदेखील होऊ लागले आहेत. दिशा पटानी नेहमीच ह’ल्ली अॅथलेसर अथवा बॅगी जिन्स पेहरावाला अधिक प्राधान्य देते आहे.

विमानतळावर टिपलेल्या तिच्या लुक्समधली जिन्स ही चक्क हाय राईज डेनिम मल्टीपल रिप्ड पॅटर्नची होती. आणि यावर तिने फिकट गुलाबी रंगाचा टॉप परिधान केल्याने तिच्या सौंदर्याला या कॉम्बिनेशनने चार चांद लावल्याचे पहायला मिळतं होते.

शिवाय दुसरीकडे आलियाचं म्हटलं तर ती तिच्या कुल आउटफिट्समधे पहायला मिळाली होती. आलियाने शॉर्ट डेनिम जिन्स तर घातलीच होती, त्याशिवाय तिच्या पेहरावाला पांढरसर रंगाच्या टी-शर्टने अगदी भन्नाट साजच चढवला होता.

आणि याच्या सोबतीला तिने अंगावर एक जॅकेट परिधान केलं होतं, या अशा जॅकेटने खरतरं सोशल मीडियावर अनेकांच लक्ष तिच्यावर लगेच खेचून घेतल्याचं पहायला मिळतं. आलिया भट रणबीर कपूर याच्यासोबत पहायला मिळाली होती. तर दिशादेखील अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत पहायला मिळाली होती.

 

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!