मित्रांनो!, बायोपिक म्हणजे एखाद्याच्या जीवनचरित्रावर आधारित असलेला चित्रपट. उदाहरणार्थ २०१६ मधील एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी, हा चित्रपट आठवतोय का? हा चित्रपट भारतीय क्रिकेटपटू कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनात आधारित चित्रपट होता, या चित्रपटात काम करणारा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत त्याने या चित्रपटासाठी खूप सारी मेहनत घेतली होती २०१६ साली रिलीज झालेला हा चित्रपट त्यावेळी खूप चालला होता.
या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर सुद्धा चांगलीच कमाई केली होती यामुळे अभिनेता सुशांतसिंग राजपूतला एक नवीन ओळख मिळाली होती. पण तुम्हाला माहीत आहे का? महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात बनवण्यासाठी धोनीने खूप भली मोठी रक्कम आकारली होती तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की धोनीने सुमारे ४५ कोटी रुपये घेतले होते.
याचबरोबर असाच एक आणखी बॉलिवूड चित्रपट संजू तुम्हाला नक्की आठवत असेल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती संजय दत्त वर आधारित असलेला हा संजू चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरने संजूची भूमिका साकारली होती संजू चित्रपट बनवण्यासाठी संजय दत्तने प्रोड्युसर्स कडून सुमारे १० कोटी घेतले होते. त्यानंतर त्याने चित्रपट निर्मितीचे हक्क त्यांच्या स्वाधीन केले होते.
अभिनेता अमीर खान याने भूमिका निभावलेला चित्रपट दंगल आठवतोय का? दंगल हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर २ हजार कोटी करणारा पहिला चित्रपट ठरला या चित्रपटातील भूमिका सुद्धा उत्तम निभावल्या गेल्या होत्या. या चित्रपटाचे हक्क मिळवण्यासाठी महावीर फोगाट यांना ८० लाख रुपये देण्यात आले होते.
भारतीय क्रीडा जगतातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध वेगवान धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित “भाग मिल्खा भाग” या चित्रपटाचे हक्क देण्यासाठी मिल्खा सिंग यांनी मात्र कोणत्याच प्रकारची पैशांची मागणी केली नाही, भाग मिल्खा भाग म्हणून रिलीज झालेला चित्रपट तरुण पिढीवर खूप प्रभाव करणारा होता. या चित्रपटाने देखील उत्तम कमाई केली या चित्रपटात मिल्खा सिंगची भूमिका अभिनेता फरहान अख्तर यांनी साकारली होती, चित्रपटाच्या निर्मात्यांकडून एक रीत आणि भारतीय संस्कृती जपत टोकन म्हणून मिल्खा सिंग यांनी स्वीकारला होता फक्त ” १ रुपया “
…मोठे लोक हे मनाने मोठे असतात… आणि म्हणूनच मानानेही मोठे असतात… असो…