सुनील शेट्टीने स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. बॉलिवूडच्या सर्वाधिक श्रीमंत स्टार्समध्ये त्याचे नाव घेतले जाते. सुनीलने अनेक चित्रपटांत बिझनेसमॅनची भूमिका साकारली. पण ख-या आयुष्यातही तो मोठा बिझनेसमॅन आहे. त्याच्या कमाईत त्याची पत्नी माना शेट्टी हिचाही मोठा हात आहे. एक यशस्वी उद्योजिका आणि यशस्वी सामाजिक कार्यकर्ता अशी तिची ओळख आहे.

बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये असे अनेक तारे आहेत ज्यांच्या बायका नेहमी लाईम लाइट मध्ये राहणे पसंद करतात. त्या फक्त आपल्या पतीच्या नावाने ओळखल्या जातात. जरी काही कलाकारांच्या बायका बॉलिवूडमध्ये काम करत नाहीत. पण चित्रपटसृष्टीपेक्षा वेगळ्या क्षेत्रात काम करून त्यांनी बरीच प्रसिद्धी आणि नाव कमावले आहे.

माना शेट्टी यांच्याबद्दल सांगावयाचे झाल्यास, माना मुस्लिम असून तिचे खरे नाव माना कादरी आहे. मानाचा जन्म २२ ऑगस्ट रोजी झाला आहे. सुनील शेट्टी जसा एक चांगला कलाकार तसाच एक मोठा उद्योगपतीही आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की माना शेट्टीसुद्धा एक यशस्वी व्यवसायिक महिला आहे. ती एक आदर्श गृहिणी असून घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळते आणि व्यवसायही करते. याशिवाय ती सामाजिक कार्य करण्यामध्येही अग्रेसर असते.

मानाने पती सुनील शेट्टीसोबत मिळून एस2 नावाने एक रिअल इस्टेट प्रोजेक्ट सुरु केला होता. या प्रोजेक्ट अंतर्गत त्यांनी मुंबईत २१ लक्झरी विलाज बनवले. याशिवाय माना एक लाईफस्टाईल स्टोअरही चालवले. याठिकाणी दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक लक्झरी वस्तू उपलब्ध आहे.

‘सेव द चिल्ड्रेन इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेशी तिचे नाव जोडलेले आहे. या संस्थेसाठी निधी उभा करण्यासाठी माना दरवर्षी इव्हेंट घेते. यातून आलेला पैसा या संस्थेला दिला जातो. इंटरनेटवर उपलब्ध आकडेवारीनुसार, सुनील शेट्टी वर्षाकाठी १५० कोटींची कमाई करतो. यात मानाचा मोठा वाटा आहे.

माना शेट्टी बॉलिवूडची “लेडी अंबानी” असल्याचे म्हटले जाते. याशिवाय माना शेट्टी सेव्ह द चिल्ड्रन इंडिया नावाच्या स्वयंसेवी संस्थेत सामील होऊन समाज सेवा करीत आहे. या स्वयंसेवी संस्थेसाठी ती नि’धी गोळा करण्याचे काम करते. निधी गोळा करण्यासाठी ती ‘आराइज’ नावाने एग्जीबिशन करत राहते. जे काही पै’से गोळा केले जातात ते सर्व मुली आणि महिलांच्या गरजेसाठी वापरले जातात. सुनील शेट्टी आणि मानाची लव्हस्टोरी एक पेस्ट्री शॉपपासून सुरु झाली होती.

येथे सुनीलने पहिल्यांदा मानाला पाहिले आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. मानाच्या जवळ जाण्यासाठी सुनीलने सर्वप्रथम मानाच्या बहिणीला मैत्रीण बनवले. मानाच्या बहिणीने दोघांची भेट घालून दिली आणि सुनीलने अगदी फिल्मी स्टाइलने मानाला प्रपोज केले होते. मानानेसुध्दा लगेच होकार दिला. दोघांनी ९ वर्षे एकमेंकांना डेट केले. १९९१ मध्ये दोघांनी लग्न केले होते.