मित्रांनो!, नुकताच मराठमोळ्या रितेश देशमुखच्या पत्नी जेनेलिया चा वाढदिवस झाला. आपणांस हे माहिती आहे का की देशमुखांच्या घरातील बाकीच्या दोन्ही सुना देखील चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत? होय! देशमुखांच्या तिन्ही सुना फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत.

विलासराव देशमुख हे राजकारणातील एक मोठं नाव होतं. विलासराव देशमुख यांना अमित देशमुख, रितेश देशमुख आणि धीरज देशमुख अशी तीन मुले आहेत. रितेशची पत्नी जेनेलिया हीच केवळ फिल्म क्षेत्रात असल्याचे बऱ्याच जणांना माहिती आहे. पण देशमुख कुटुंबातील इतर दोन सुनांनाही फिल्मी बॅकग्राऊंड असल्याचं फारच कमी लोकांना माहिती आहे.

देशमुख घराण्यातील एक मुलगा रितेश देशमुख हा अभिनेता असल्याचं सर्वांना माहितच आहे. त्याची पत्नी जेनेलिया ही देखील अभिनेत्री आहे. या दोघांकडे क्युट कपल म्हणून पाहिलं जातं. रितेश आणि जेनेलिया ने केलेल्या “तुझे मेरी कसम” या चित्रपटानंतर त्यांचे बंध जुळून आले. त्या दोघांनी ३ जुलै २०१२ ला लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष गोष्ट अशी की यांचं दोन वेळा लग्न झालं आहे.

कारण रितेश हिंदु आहे आणि जेनेलिया ख्रिश्चन आहे. त्यामुळे त्यांनी एकदा हिंदु आणि एकदा ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने आपला विवाह करून घेतला. रितेश आणि जेनेलिया यांना राहिल आणि रियान अशी दोन अपत्य आहेत. रितेश – जेनेलिया दोघेही सोशल मिडियावर चांगलेच ॲक्टिव्ह असतात. अधुन मधून ते आपल्यासह आपल्या मुलांचेही फोटो अपलोड करत असतात.

अमित देशमुख यांची पत्नी आदिती प्रताप या आहेत. २००८ साली दोघे विवाहबद्ध झाले आहेत. आदिती प्रताप या सुद्धा एक उत्तम अभिनेत्री आहे. आता त्या इंडस्ट्रीमध्ये सक्रिय नसल्या तरी पुर्वी त्यांनी बऱ्याच फिल्म्समध्ये चांगली कामे केली आहेत. अमित आदिती यांना अवीर आणि अवान ही दोन मुले आहेत. अमित देशमुख आणि आदिती प्रताप देशमुख यांचं ॲरेंज मॅरेज आहे.

देशमुख कुटुंबातील धाकटे पुत्र धीरज देशमुख यांच्या पत्नीही फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित व्यक्ती आहेत. धीरज देशमुख यांचा विवाह दिपशिखा भगनानी यांच्याशी झाला. दिपशिखा या फिल्म इंडस्ट्रीमध्ये निर्मात्या म्हणून काम करत असतात. २०१२ सालीच या दोघांनी लग्न केले होते. या दांपत्याला वंश आणि दिवियान अशी अपत्य आहेत.

बाॅलीवूडमधील एक निर्माते वासू भगनानी यांची दिपशिखा ही मुलगी आहे. त्याबरोबरच अभिनेता जॅकी भगनानी यांच्या त्या बहिण आहेत. सध्या देशमुखांच्या सुनांपैकी जेनेलिया हिच फक्त बाॅलिवुड मध्ये कार्यरत असली तरी इतर दोघी आदिती प्रताप आणि दिपशिखा भगनानी यांनाही फिल्मी बॅकग्राऊंड आहे.