श्वेता तिवारीने शेअर केला वादाचा व्हिडिओ, तिच्या घटस्फोट घेतलेल्या नवऱ्यासोबतचा वाद आला चव्हाट्यावर!

बॉलीवुडमधील सिनेसृष्टीत अगदीच कायम सक्रीय राहत असलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी, श्वेताच्या अनेक गोष्टी आज प्रसारमाध्यमांमधे चांगल्याच प्रमाणात प्रसिद्ध होत असतात. शिवाय वैयक्तिकरित्या श्वेता तिवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अनेक गोष्टीदेखील शेअर करत असल्याची पहायला मिळते. तर मुळात तिने सध्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करत फार मोठी खळबळ माजवल्याची समजतं आहे. तुम्हाला ठाउकचं आहे की, अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिने घटस्फोट दिलेला नवरा अभिनव कोहली दोघांमधील वाद कायम चर्चेत राहिले आहेत. श्वेता तिवारी सध्याच्या घडीला आपली मुलगी पलक आणि मुलगा रेयांश कोहली यांच्यासोबत राहत असल्याची पहायला मिळते आहे. आणि तिने नुकताच एक गौप्यस्फोट केला आहे, तिचं म्हणणं आहे की, तिचा पती तिच्या मुलाला तिच्यापासून दूर हिसकावून घेऊन जाऊ इच्छितो आहे.

आता मुळात या घटनेचा सिसीटिव्हीत कैद झालेला व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आत्तापर्यंत हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो आहे, आणि अनेक लोकांचा याला विविध रूपातला प्रतिसादही मिळताना पहायला मिळतं आहे. यामधे मुलाकरता श्वेता तिवारी अगदी अक्षरशः जमिनीवर लोळत असल्याचं चित्रही पहायला मिळतं आहे. श्वेता तिवारी या अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य गेल्या काही काळापासून बरचं चर्चेत आल्याच पहायला मिळालं आहे. घटस्फोटानंतर मुलगा रेयांश याला सांभाळणं, त्याच पालनपोषण करणं या मुद्यावरून अभिनव कोहली व श्वेता यांच्यात हा वाद सुरू आहे. श्वेता म्हणते, मला माझ्या मुलाला सुरक्षिततेच्या हमीमधे ठेवायचं आहे, त्याला मी असुरक्षित ठिकाणी नाही ठेवू शकत.

श्वेताच्या म्हणण्यानुसार तिला मुलगा रेयांश याला वडीलांपासून दूर ठेवायचं आहे. अभिनव याची ईच्छा आहे की, रेयांशचा सांभाळ त्याने करावा आणि त्याला रेयांशला स्वतःपाशी ठेवून घ्यायचं आहे. परंतु श्वेता म्हणते की, तो माझ्या मुलाची चांगली देखरेख करू शकणार नाही तर त्यामुळे मी मुलाला त्याला जबाबदारीवर सोडू शकत नाही. अभिनव मात्र असा दावा करतो की, श्वेता तिवारी त्याला त्याच्या मुलाला भेटूदेखील देत नाही. आणि असा दावा ज्यावेळी अभिनव याने केला त्यावेळी श्वेताने मी तात्पुरता एक पुराव्यादाखल व्हिडिओ शेअर करते, लोकांनी पाहून काय ते ठरवावं असं म्हणतं एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओमधे अभिनव रेयांशला स्वत:कडे ओढताना पहायला मिळतो तर रेयांशला स्वत:कडे घेण्यासाठी श्वेता अगदी जमिनीवर लोळायलादेखील लागते. श्वेता तिवारीची ओळख तशी एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणूनच सिनेसृष्टीत पहायला मिळते.

तिने आजवर हिंदी टिव्हीवर मालिकांमधून आपल्या कामाची चांगलीच छाप उमटवली आहे. शिवाय तिच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर एक गोष्ट अशी की, अभिनव हा श्वेताचा दुसरा पती होता. पहिल्या लग्नाच्या नऊ वर्षांच्या संसारानंतर श्वेताने पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला. पहिला पती दारूच्या नशेत आपल्याला रोज मारहाण करायचा हे तिने सांगितलं होतं. त्यानंतर तीन वर्षे गेली आणि तिची भेट अभिनव सोबत झाली. मग अभिनव आणि श्वेता यांच प्रेम जुळलं नी लग्नही झालं. पण नंतर मात्र दोघांच्या नात्यात प्रचंड खोट पडली. श्वेता खरतरं तिच्या वैवाहिक, वैयक्तिक जीवणात आजवर प्रचंड मानसिक तणावातून गेलेली पहायला मिळते. तरीदेखील ती आजपर्यंत ज्या खंबीरपणे स्वत:चे पाय रोवत उभी आहे, ते तिचं कौतुकच म्हणावं लागेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!