हे जाणून अगदी हैराण व्हालं, पहा कसे शुट होतात सिनेमा आणि वेबसिरीजमधील सेक्स सिन्स!

अनेकदा जेव्हा आपण एखादा सिनेमा किंवा एखादी वेबसिरीज पाहतो ते पाहत असताना जेव्हा कधी त्यात एखादा फारच इंटिमसी वाला सेक्स सिन येतो तेव्हा आपल्याला अनेक प्रश्न पडतात. कलाकार खरचं इतक्या प्रमाणात सेक्स सिन्स कॅमेरासमोर करत असतील का? किंवा कशा प्रकारे ते याला सामोरे जात असतील? पण काही गोष्टी या कशा पद्धतीने शुट केल्या जातात हे आता आपण जरा जाऊन घेऊयात. मुळात एक सेपरेट दिग्दर्शकाची यासाठी नेमनूक केलेली असते, ज्याच्या देखरेखेखाली हे सारं पार पडलं जातं. या दिग्दर्शकाला इंटिमसी को-आॉर्डिनेटर असं म्हटलं जातं. प्रत्येक कलाकारांची एकमेकांसोबतची जवळीक आणि एकमेकांना समजून घेण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाचा आपला वैयक्तिक कम्फर्ट झोन साधत त्या सिनची शारीरिक जवळीकतेची गरज कशा पद्धतीने साध्य करायची याची जिम्मेदारी या इंटिमसी को-ऑर्डिनेटरवर दिलेली असते. खरतरं सिनेसृष्टीत आजपर्यंत तरी या स्पेशल युनिटची गरज पडलेली नसायची. पण आजच्या काही गोष्टी बदलल्या आहेत, जिथे कथेची गरज असते तिथे सेक्स सिन टाकलाच जातो.

आणि त्यामुळेच या इंटिमसी को-आॉर्डिनेटरची आता सिनेसृष्टीत चांगलीच डिमांड वाढलेलीदेखील पहायला मिळते. असं म्हटलं जात की, 1970 सालात अमेरिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार पहिल्यांदाच अशा इंटिमसी को-आॉर्डिनेटरचा वापर सिनेमाच्या सिन शुट करण्यात आला होता. जगप्रसिद्ध असलेल्या “एचबीओमॅक्स” यांच्या पाठोपाठ आता नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम यांनीदेखील काळाची गरज ओळखून इंटिमसी को-ऑर्डिनेटरचा योग्य तिथे वापर करत सिन शुट करण्याच विचारात घेतल्याचं पहायला मिळतं आहे. आज अनेक रसिकप्रेक्षकांच्या मनात जे काही प्रश्न घोंघावत असतात तर त्याच उत्तर हे असं काहीसं आहे. गेल्या काही काळात अनेक प्रसारमाध्यमांमधे सेक्स सिन कसे शुट होतात याबाबत अफवादेखील पसरल्याच्या पहायला मिळतं होत्या. परंतु त्या सर्व केवळ अफवा होत्या आणि खरी गोष्ट काहीशी अशी होती.

भारतात सिनेसृष्टीत आता इंटीमसी को-आॉर्डिनेटर हे एक करियरचा नवा भाग म्हणून उभारी घेऊ लागलेलं आहे. तर आपण एकदा थोडसं सविस्तर जाणून घेऊयात हा इंटिमसी को-आॉर्डिनेटर नेमका काम काय करतो? तर यांच काम थोडसं नृत्यदिग्दर्शक वा अ‍ॅक्शन दिग्दर्शक यांच्याप्रमाणेच म्हणता येईल, जेवढा स्पेसिफिक भाग शुट करून हवा आहे तो यांच्याकडे सोपवून तो पुर्ण करून घ्यायचा असं काहीसं. खोटा सेक्स सिन अथवा लैंगिक हिंसा दाखवणारा एखादा प्रसंग उभा करायचा तर त्यावेळी त्या कलाकाराला त्याच्या सुरक्षिततेची हमी करून तो सिन योग्यरित्या पार पाडून घेणं ही इंटिमसी को-आॉर्डिनेटरची जबाबदारी असते. सिनेमा अथवा वेबसिरीज यांच्या दिग्दर्शकाच्या मधे आणि कलाकारांच्या मधे एका बॉन्डच काम हा इंटिमसी को-आॉर्डिनेटर करत असतो. कुठल्याही कलाकाराचं सिनेसृष्टीत शोषण होऊ नये वा कुणी विनाकारण एखाद्यावर जबरदस्ती करू नये याकरता हा इंटिमसी को-आॉर्डिनेटर फार महत्वाची भुमिका बजावतो. एखाद्या कलाकाराने आज सिन शुट करायला होकार द्यावा आणि पुन्हा भविष्यात त्याने त्या सिनवर नाराजी व्यक्त करत माझ्यावर अन्याय झाला असं म्हणायची वेळ येऊ नये याकरताच या इंटिमसी को-ऑर्डिनेटरवर फार मोठी जबाबदारी असल्याची पहायला मिळते. या इंटिमसी को-आॉर्डिनेटरकडे काही अशी साधणं आहेत ज्यांमुळे दोन कलाकार सेक्स करत आहेत हे पडद्यावर दिसून तर येत पण तो सिन शुट होत असताना ते एकमेकांमधे आवश्यक तेवढ अंतर राखून तो सिन शुट करू शकतात.

खरतरं अनेकदा कलाकारांच्या एकमेकांच्या अंगाला स्पर्शदेखील न होता हे सिन सहजरित्या शुट केल्या जातात. तुम्ही म्हणालं हे फारच अजब आहे, आज तंत्रज्ञान फारच प्रभावी झालेलं आहे. आणि आजच्या घडीला या इंटिमसी को-आॉर्डिनेटरची खरी गरज नक्कीच आहे असं म्हणावं लागेल. कारण यामुळे कोणावर अन्याय तर होणं दुरचं पण गरजेच्या गोष्टी सहजरित्या शुट करता येणं शक्य झालं आहे. या इंटिमसी को-आॉर्डिनेटरच्या मध्यस्थीमुळे नवख्या कलाकारांना आता कोणत्या गोष्टीची अडचण अथवा मनात संभ्रम न ठेवता सिन शुट करणं सोप्प झालं आहे. कारण नवखे कलाकार थेट सेक्स सिन्स देत नाहीत, त्यांच्यासाठी ती थोडीशी अडचण असते. परंतु याने तेदेखील दूर झालं आहे. भारतात सध्या आस्था खन्ना या इंटिमसी को-आॉर्डिनेटरची भुमिका पार पाडत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!