इतिहासात पहिल्यांदाच तयार झाला होता इतका खास सोन्याचा लेहंगा, पहा ईशा अंबानी साठी डिझाईनरची कमाल!

आपल्या देशातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या व्यक्तींच्या यादीतलं एक महत्त्वाचं नाव सर्वांना आज माहितच आहे. आणि ते म्हणजेच मुकेश अंबानी. तर याच मुकेश अंबानी यांच्या बाबतीत आज अनेक गोष्टी सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात इकडे तिकडे पसरत असतात. आणि त्यांच्याबाबत पसरणाऱ्या काही व्हायरलं बातम्या अक्षरशः सोशल मीडियावर धुमाकूळ घालून सोडतात. तर सध्या अशाच एका गोष्टीची चर्चा सगळीकडे रंगली आहे, चला तर जरा जाणून घेऊयात ही खबर नेमकी आहे तरी काय? तर तुम्ही आज जाणताच की, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांनी पत्नी नीता अंबानी यांची मुलगी ईशा हिचं लग्न गेल्याच काही काळात पार पडलं. आणि या लग्नाचा चर्चा अख्खा जगभर प्रसिद्ध झाला.

तर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा हीचं भारतीय पारंपरिक पोशाखांवर विशेष प्रेम आहे. बहुतेक वेळा जेव्हा कधी तिच्या छबी टिपल्या जातात तेव्हा ती अधिकरित्या साडी अथवा इतर कोणत्याही भारतीय पोशाखातचं पहायला मिळते. अगदी मेट गाला हा प्रसिद्ध कार्यक्रम असो वा स्वत:च लग्न ती दोन्ही ठिकाणी खास लहंगा परिधान करूनच आल्याची पहायला मिळाली होती. ईशा अंबानी नेहमीच तिच्या हटके लुक्स आणि त्यांवर परिधान केलेल्या पारंपरिक पोशाखाने इतरांच लक्ष वेधून घेते. ती अगदी तिच्या ड्रेसिंग सेन्सने बॉलिवुडमधल्या भल्याभल्या अभिनेत्रींनाही टक्कर देते. अगदी पारंपरिक पासून ते वेस्टर्नपर्यंत सर्वच प्रकारच्या आउटफिट्सना एक वेगळा साचा चढवत ईशा अंबानी तिच्या ड्रेसिंग सेन्सला अधिक प्रभावशाली बनवते.

मुळात खरा कहर आणि इतिहासात नोंद घेतली जाईल असा पराक्रम तर ईशा अंबानीने तिच्या लग्नात परिधान केलेल्या लेहंग्याने केला होता. चक्क सोन्याच्या तारांपासून तयार करण्यात आलेला लेहंगा ईशाने तिच्या रिसेप्शनमधे परिधान केला होता. ईशाच्या या खास लेहंग्याची चर्चा लग्नानंतरही कित्येक दिवस सोशल मीडिया आणि इतर ठिकाणी रंगल्याची पहायला मिळते. मुळात आपल्या रिसेप्शनला ईशाने सोनेरी आणि आयव्हेरी रंगाचा लेहंगा अंगावर परिधान केला होता. यावर सोने व चांदीच्या तारांपासून केलेली एंब्रोयडरी लगावण्यात आली होती. हा डिझाईनर लेहंगा बनविण्याकरता शीर-शीमर, सिल्क व टिश्यू फॅब्रिक यांसारख्या गोष्टींचा वापर करण्यात आला होता.

याचमुळे या आउटफिटची चमक अगदी इतकी प्रचंड खुलली होती की, पाहणाऱ्यांचे डोळे दिपावल्या गेले होते. डिझाईनरकडून अगदी ईशाच्या म्हणण्यानुसार तिच्या आवडीच्या साच्यातली एंब्रोयडरी यावर वठवण्यात आली होती. ईशाचं हे आउटफिट अगदी इटालियन डिझाईनरने तयार केलं होतं. लक्झरी फॅशन हाऊस “वॅलंटिनो” यांच्याकडून प्रथमच इतक्या अवघड आणि रेखिव प्रमाणातलं काम पार पडलं होतं. वॅलंटिनो हे डिझाईनच्या बाबतीत गेल्या कित्येक वर्षांपासून जगप्रसिद्ध आहेत शिवाय त्यांनी सोनम कपूर, प्रियंका चोप्रा, ऐश्वर्या राय यांच्याकरताली अनेक डिझाईन्स तयार केले आहेत. पण यावेळी केवळ ईशाच्या मागणीनुसार तिला हव्या त्या पद्धतीने त्यांनी खास सोन्याच्या पद्धतीने साज लावलेला लेहंगा बनवून दिल्याच पहायला मिळतं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!