अभिनेत्री दिपिकाने अनेकवेळा प्रेमात केली काही गोष्टींची हद्दपार, एका बॉयफ्रेंडने तर दिली होती ही कबुली!

हिंदी सिनेसृष्टीत आजवर अनेक प्रेमप्रकरणांची कहानी आपल्याला ऐकायला, पहायला मिळते. त्यातही अनेक कलाकार बऱ्याचदा तर एक नाही, दोन नाही तर चार – पाच वेळा प्रेमात पडतात आणि नव्याने त्यांचे नातेसंबंध सुरू होतात. पण सहसा असं एखाद्या अभिनेत्याबाबत अधिक प्रमाणात पहायला मिळतं. कारण अभिनेत्री एखाद्या धक्क्याने सावध होऊन पुढे फार संयमाने व धीरानं वागताना पहायला मिळतात. परंतु आता एक खास खुलासा करायचा म्हटलं तर हे दरवेळी असचं होईल किंवा असचं व्हावं असं काही नसतं. आज आपण चक्क अशा व्यक्तीच्या आयुष्यातील विविध घडामोडी पाहणार आहोत जी आजच्या घडीला हिंदी सिनेसृष्टीतील अर्थात बॉलीवुडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. आणि ती आता एका सर्वोत्तम अभिनेत्याची पत्नीदेखील झालेली आहे. तर अर्थातच आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ती इतर कोणी नसून चक्क दिपीका पादुकोन ही आहे.

अर्थात आज दिपीका तिचं आयुष्य स्थिरावलेलं आणि फारच सुंदररित्या पार पडत असल्याचं पहायला मिळतं आहे. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की, एकेकाळी याच दिपीकाच्या विविध प्रेमप्रकरणांची प्रसारमाध्यमांमधे कायम चर्चा रंगत असायची. त्याला कारणदेखील काहीशी अशीच होती असं म्हटलं तरी हरकत नसावी. आज अभिनेत्री दिपिका पादुकोन अगदी व्यवस्थित तिचं आयुष्य जगते आहे. दिपीकाने अभिनेता रणवीर सिंह याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता रणवीर तिच्या आयुष्यात फार महत्वाचा व्यक्ती ठरला आहे. रणवीर सिंह याने कायम आणि वारंवार दिपीकाला हवी ती मदत गरजेच्या वेळी केल्याची पहायला मिळते. अभिनेता रणवीर सिंह त्याच्या कलाकार या ओळखीव्यतिरिक्त एक उत्तम व्यक्तिमत्त्वाचा माणूस म्हणूनही बॉलिवुडमधे चांगलाच परिचित आहे.

दिपिका आणि रणवीर आज विवाहबद्ध असले तरी आता आपण दिपिकाच्या काही खास प्रेमप्रकरणांबद्दल जाणून घेऊयात. सर्वप्रथम बोलायचं म्हटलं तर दिपिका आणि निहार पांड्या ही जोडी. दिपिका तिच्या मॉडेलिंगच्या काळात निहारसोबत डेट करत होती. दोघे काही काळ चक्क लिव्ह इनमधेही राहिल्याचं पहायला मिळालं. परंतु त्याच काळात काहीतरी बिनसल्याने दोघांनी आपल्या वाटा बदलायच्या ठरवल्या. यावर निहारने एका ठिकाणी पोस्टही केली होती की, मला दिपिकाचा एक्स बॉयफ्रेंड म्हणू नका. मला तिच्याशी आता काही देणघेणं नाही.

निहार पांड्यानंतर सांगायचं म्हटलं तर दिपिकाच्या यादीत नाव सामिल होतं ते म्हणजे भारताच्या माजी क्रिकेट कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनी याचं. अर्थात त्या काळात दोघांचेही फोटोज सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरलं होत असल्याचे पहायला मिळाले होते. त्या काळात शाहरूख खानच्या माध्यमातून धोनी आणि दिपीका यांची ओळख झाली होती. आणि हळूहळू ती ओळख काहीशी प्रेमाच्या फारच जवळ आली. महेंद्रसिंग धोनी आणि दिपीका दोघेही मात्र यावर कधीही स्पष्टपणे बोलले नव्हते.

दिपिकाच्या यादीत आणखी एका क्रिकेटपटूच्या नावाचा समावेश होतो, हा क्रिकेटर खेळाडू म्हणजे युवराज सिंह. युवराज त्याच्या तडाखेबंद फलंदाजीच्या कलेमुळे अवघ्या क्रिकेटक्षेत्रात ओळखला जातो. त्याच्याइतकं जबरदस्त क्रिकेट क्वचितच खेळाडू खेळू शकतील. तर युवराजच्या आणि दिपिकाच्या बातम्याही अगदी झपाट्याने प्रसारमाध्यमांमधे पसरल्या. दोघे अनेकदा हॉटेलमधेही एकत्र पहायला मिळाले होते. काही गोष्टी तर इतक्या प्रखर्शाने पुढे जाऊ लागल्या होत्या की, दोघांच्या साखरपुड्याची चर्चा रंगली होती. परंतु नंतर दोघे एकत्र कधीच पहायला मिळाले नाहीत. आणि त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्याचं दिसून आलं.

यानंतर जे एक नाव प्रखर्शाने चर्चेत येतं ते म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि दिपीका पादुकोन. अर्थातचं हे दोघे बराच काळ एकत्र होते याबाबत दोघांनीही खुलासा केलेलाच आहे. दिपिकावर केलेल्या चिटमुळे तिने रणबीरसोबत न राहण्याचा निर्णय घेतला. परंतु आज दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दिपिका रणबीर ही जोडी कदाचित विवाहबंधनात अडकली असती परंतु रणबीरने कॅटरिनाकरता दिपिकापासून थोडा वेगळा मार्ग स्विकारला होता जे दिपिकाने वेळीच सावध होऊन स्वत:ला सावरलं होतं.

यापुढे येतं ते नातं म्हणजे सिद्धार्थ माल्या. अर्थातच उद्योगपती विजय माल्या यांचा मुलगा. 2011 सालात दोघे अगदी तुफान प्रेमात असल्याचे दिसून येत होते. पार्ट्या करणं, एकमेकांसोबत फिरणं, आयपीएल मॅचेस एकत्रच पाहणं आणि सतत एकत्र राहणं अशात दोघांचही नात बहरत असल्याच पहायला मिळतं होतं. एका मॅचच्या वेळी तर सिद्धार्थने थेट प्रेक्षकांच्या हजेरीत लिटलॉक किस केलं होतं. यानंतर दोघांच ब्रेक-अप झालं. आणि दोघांनीही एकमेकांच्या स्वभावावर आरोप केल्याचे पहायला मिळाले. सिद्धार्थच्या मते दिपिकाला प्रेमात असताना कुठलचं भान राहत नाही असं त्याच म्हणणं होतं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!