अमिताभ बच्चन यांच्या सुर्यवंशम सिनेमाच्या दोन्ही अभिनेत्रींची डबींग चक्क रेखाने केली होती, जाणून घ्या सविस्तर किस्सा!

हिंदी सिनेसृष्टीत काही नाती फारच विविध स्वरूपाची असलेली आपल्याला पहायला मिळतात. त्यापैकी एक अगदीच खास नातं म्हणजे अमिताभ आणि अभानेत्री रेखा यांच. अनेकदा असंही म्हटलं जातं की, रेखाजींनी केवळ अमिताभ यांच्यामुळे लग्न केलं नाही. हिंदी सिनेसृष्टीत अर्थात बॉलीवुडमधे या दोघांच प्रेमप्रकरण अगदी भन्नाट स्वरूपात गाजलं. आजही बॉलीवुडमधे जिथे कुठे कधी अमिताभ यांच नाव येतं सर्वांना सोबत आठवते ती रेखाच. बॉलीवुडच्या बिग बी असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या अनेक चित्रपटांनी आजवर बॉक्स ऑफिसवर नेहमीच धमाल केल्याची पहायला मिळाली आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे, सुर्यवंशम हा सिनेमा. १९९९ साली आलेल्या सुर्यवंशम सिनेमाने एक वेगळाच पराक्रम करून दाखवला.

तुमचा विश्वास कदाचित बसणार नाही परंतु हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अगदी फ्लॉप ठरलेला सिनेमा आहे. आणि त्यानंतर जेव्हा हा सिनेमा टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला त्यावेळी मात्र याची प्रसिद्धी भलतीच शिगेला पोहोचली. आणि टेलीव्हिजनच्या माध्यमातून हा सिनेमा अगदी हिट सिनेमा ठरला. अमिताभ बच्चन यांच्या एखाद्या सिनेमाचा असाही विक्रम असू शकतो हे जरा आश्चर्यकारकचं. आज या सिनेमातील एकूण एक प्रसंग नी संवाद रसिकप्रेक्षकांच्या अगदी ओठांवर खिळून राहिलेले पहायला मिळतात. आजवर एखादाही असा प्रेक्षक नसेल ज्याला हा सिनेमा आवडला नसेल. तर याच सिनेमाची खास गोष्ट अशी की, या सिनेमाकरता अभिनेत्री रेखा हिने चक्क स्वत:चा आवाज देत डबिंग केलं होतं. आजवर ही गोष्ट तर अनेकांना ठाऊकही नव्हती. परंतु या सिनेमात जितकी भुमिका ऑनस्क्रीन कलाकारांनी बजावली तितकिचं महत्वपूर्ण भुमिका रेखानेदेखील त्या काळात बजावली होती.

सुर्यवंशम या सिनेमात दोन अभिनेत्री होत्या, एक म्हणजे जयासुधा आणि दुसरी अभिनेत्री म्हणजे सौंदर्या. या सिनेमात अमिताभ बच्चन यांचे दोन रोल होते. यात ठाकुर भानुप्रताप सिंह यांचा मुलगा असलेला हिरा ठाकुर हा नायक दाखवण्यात आला आहे. हिरा ठाकुर याच्या आईची भुमिका जयासुधा या अभिनेत्रीने तर त्याच्या पत्नीची भुमिका ही सौंदर्याने पार पाडली होती. तुम्ही जेव्हा केव्हा हा सिनेमा थोड्याश्या बारकाईने पहायला जालं तेव्हा आवर्जून तुमच्या लक्षात येईल की, दोन्ही अभिनेत्री अर्थात जयासुधा आणि सौंदर्या यांचा आवाजात बऱ्याच प्रमाणात साम्य आहे. ते साम्य असण्याला कारण अर्थातच रेखा आहे. सोनी मॅक्स यांनी टिव्हीवरील सिनेमाची लोकप्रियता जाणून या सिनेमाचे पुढील शंभर वर्षांचे कॉपीराईट अधिकार खरेदी केले होते. या सिनेमाला हळूहळू ब्लॉकबस्टरचा टॅग लागून गेला.

या सिनेमातील प्रत्येक पात्राला रसिकप्रेक्षकांकडून अगदी भरभरून प्रतिसाद आणि प्रेमदेखील मिळाले आहे. आणि अभिनेत्री रेखाने जयासुधा व सौंदर्या यांचा आवाज डब करत या सिनेमाला आपला अदृश्य हातभार लावला. रेखाने या सिनेमाची डबिंग केली हे नक्कीच विशेष चकित करणार होतं. कारण अनेकदा रेखा आणि अमिताभ यांच्या प्रेमसंबंधीच्या गोष्टी त्या काळात प्रकाशमाध्यमांमधे झळकत असायच्या. आणि त्यात भर म्हणून हा सिनेमा अनेकांना कारण म्हणून भेटू शकला असता परंतु अनेक वर्षे ही बाब थोडीशी गुपितच ठेवण्यात आली होती. जेणेकरून सिनेमाबाबत आणि रेखा अमिताभ यांच्या नात्याबद्दल विविध गोष्टींना माध्यमांमधे उधाण येऊ नये. परंतु काही असलं तरी अभिनेत्री रेखाने तिचं काम उत्तमरित्या पार पाडलं आहे असंच म्हणावं लागेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!