बॉलिवूड इंडस्ट्रीत कधी काय होईल हे काहीच सांगता येत नाही. कारण ही ग्लॅमरस दुनिया आहे. इथे नाती अशी बनतात आणि बिघडतात. तर आज आपण अश्या काही नात्यांची माहिती घेणार आहोत त्यामधील अभिनेता हा घ’ट’स्फो’ट घेऊन दुसऱ्यांदा लग्न बं’ध’ना’त अ’ड’क’ले’ला आहे. किंवा त्यात मग गायक वगैरे दुसरे सर्व कलाकार ही आलेच. तर चला मग सविस्तर जाणून घेऊ.

प्रेमात काही होऊ शकतं. बरं त्यात असं म्हणतात ना की प्रेमाला कुठल्याही बंधनाची पर्वा नसते. हेच वाक्य खरं होताना बॉलिवूड कलाकारांच्या रिअल लाईफमध्येही अनेकदा दिसलं. बॉलिवूडच्या अनेक अशा प्रसिद्ध अभिनेत्री आहेत ज्यांना विवाहित पुरुषांवर प्रेम झालं आणि त्यानंतर त्यांनी लग्नगाठही बांधली. या यादीत हेमा मालिनीपासून करीना कपूरचं देखील नाव आहे.

धर्मेंद्र: हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लव्हस्टोरी जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे. यांचं सिनेमांच्या चित्रीकरणादरम्यान एकमेकांवर प्रेम झालं. धर्मेंद्र आधीपासून विवाहित असल्याचं माहिती असूनही त्यांनी एकमेकांवर प्रेम केलं आणि पुढे विवाहबंधनात अडकले. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचं नाव प्रकाश कौर आहे.

बोनी कपूर: बोनी कपूर यांचं श्रीदेवी यांच्यावर प्रेम होतं. पुढे श्रीदेवीदेखील त्यांच्या प्रेमात पडल्या. 1996 मध्ये या दोघांनीही लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुली असून मोठी मुलगी जान्हवी कपूर चित्रपटांमध्ये काम करते. बोनी यांनी श्रीदेवी यांच्याआधी मोना कपूर यांच्यासोबत विवाह केला होता.

जावेद अख्तर: बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी आपली पहिली पत्नी हनी ईरानी यांच्यासोबत त’ला’क घेतल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आजमी यांच्यासोबत विवाह केला. दोघंही एकमेकांसोबत खास वेळ घालवत आहेत.

राज कुंद्रा: शिल्पा शेट्टीचं नाव खूप अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं. मात्र, तिनं लग्न उद्योगपती राज कुंद्रासोबत केलं. 2009 मध्ये या दोघांनी लग्न केलं. राजनं शिल्पाच्या आधी कविता नावाच्या एका महिलेसोबत विवाह केला होता. शिल्पासोबत लग्न करण्यासाठी राजनं कविताला घ’ट’स्फो’ट दिला होता.

अनिल थडानी: रवीना टंडननं प्रसिद्ध फिल्म डिस्ट्रीब्यूटर अनिल थडानीसोबत 2003 मध्ये लग्न केलं. रवीनासोबत लग्न करण्याआधी अनिलनं आपली पहिली पत्नी नताशा सिप्पीला घ’ट’स्फो’ट दिला.

सैफ अली खान: करीना कपूरनं सैफ अली खानसोबत लग्नगाठ बांधली. आता करीना दुसऱ्यांदा आई होणार असून त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव तैमूर आहे. सैफ अली खाननं करीनाच्या आधी अमृता सिंगसोबत लग्नगाठ बांधली होती.

ते हेच नाहीत तर असे अनेक बॉलीवूड मध्ये उदाहरण आहेत. त्यामुळे इथं नात्याचं काही खरं नसतं आणि काही तर खूप घट्ट असतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.