बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर नुकतीच 46 वर्षांची झाली आहे. मराठमोळ्या उर्मिलाने 1980 मधून कलियुग या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर मासूम ह्या चित्रपटामुळे तीला बाल कलाकार म्हणून ओळखली मिळाली.

नायिका म्हणून नरसिंह हा तिचा पहिला चित्रपट असला तरी तिला खरी ओळख रामगोपाल वर्माच्या रंगीलातून मिळाली. असे म्हणतात की रंगीला मध्ये काम करत असताना राम गोपाल यांचे उर्मिलावर मन जडले होते. इतके की ते आपल्या चित्रपटात फक्त उर्मिलाच घ्यायचे.

एक काळ असा होता की रामू त्याच्या चित्रपटात उर्मिलाला कास्ट करायचा. केवळ राम गोपाल वर्मा ह्यांचे चित्रपट करण्यासाठी उर्मिलाने इतर अनेक दिग्दर्शकांसोबत काम करण्यास नकार दिला.

रामगोपाल वर्माचे बॉलिवूडमधील बर्‍याच लोकांच्यासोबत पटत नसल्यामुळे अनेक दिग्दर्शकांनी उर्मिलाला त्यांच्या चित्रपटात घेणेच बंद केले. हळूहळू तिला चित्रपट मिळणे बंद झाले आणि तिचे करिअर उ’ध्व’स्त झाले.

उर्मिलासाठी राम गोपाल वर्मा यांनी एकदा माधुरी दीक्षितला ही चित्रपटातून काढून टाकले होते अशा बातम्या ही पसरल्या होत्या. वर्मा उर्मिलाच्या एवढे प्रेमात होते की ते प्रत्येक चित्रपटात उर्मिलाला साइन करत असत. मात्र, जेव्हा उर्मिलाला हे कळले तेव्हा तिने राम गोपाल वर्माचा प्रस्ताव फे’टा’ळून लावला. एवढेच नव्हे तर उर्मिलाने राम गोपाल वर्माबरोबर चित्रपट करणेही बंद केले.

‘रंगीला’ पूर्वी राम गोपाल वर्मा यांनी उर्मिलाला 1992 मध्ये तेलुगू चित्रपट ‘अंतम’, द्रोही आणि 1993 मध्ये रिलीज झालेल्या ‘गायम’ मध्ये ही संधी दिली होती.

राम गोपाल वर्माचा उर्मिलाच्या प्रेमात एवढे बुडाले होते की त्यांनी त्यांच्या अंधेरी येथील ऑफिसमधल्या खोलीचे नाव ‘उर्मिला मातोंडकर’ ठेवले होते.

राम गोपाल वर्मा सोबत काम करणे बंद केल्यानंतर उर्मिलाने काही ऑफबीट चित्रपटांमध्ये काम करण्याचा प्रयत्नही केला. यामध्ये पिंजर आणि मैने गांधी को नहीं मारा, तसेच मराठी चित्रपट आजोबा अशा चित्रपटांचा समावेश आहे, परंतु हे चित्रपट फ्लॉप झाल्याने उर्मिलाचा हा प्रयत्न अयशस्वी झाला.

3 मार्च 2016 ला उर्मिलाने तिच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान कश्मिरी व्यावसायिक मोहसीन अख्तर मीरशी लग्न केले. उर्मिलाने राजकारणातही तिचे नशीब आजमावले पण यात तिला यश मिळाले नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तिने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता पण 5 महिन्यांनी तिने राजीनामा दिला आणि शिवसेनेत प्रवेश केला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.