मित्रांनो!, बॉलिवूडचा भिडू जगुदादा म्हणजेच जॅकी श्रॉफचा मुलगा, ऍक्शन स्टंट स्टार आणि प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफने नुकतेच मुंबईतील एका अलिशान ठिकाणी घर खरेदी केलं आहे. सध्या अनेक सेलिब्रिटी प्रॉपर्टी खरेदी करताना दिसत आहेत. त्यात टायगरनेही आता महागडं घर खरेदी केलं आहे. मुंबईतील खार वेस्ट येथील अतिशय महागड्या ठिकाणी त्याने हे घर खरेदी केलं आहे.

खार वेस्ट येथील रुस्तमजी पॅरामाउंट येथे त्याने घर घेतलं आहे. हे एक सेफ गेटेड आणि अल्ट्रा एक्सक्लुझिव्ह कम्युनिटी आहे. यात 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 बीएचके अपार्टमेंट्स आहेत. टायगरसोबत त्याचे आई वडील जॅकी श्रॉफ, आयशा श्रॉफ आणि बहीण कृष्णा श्रॉफ देखील त्याच्यासोबत राहणार आहेत.

श्रॉफ कुटुंब पूर्वी कार्टर रोड येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत होतं. तिथे ते भाड्याने राहत होते. तर आता टायगरने नवीन 8 बेडरुम्सचं घर खरेदी केलं आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब आता इथे शिफ्ट होणार आहे.या अपार्टमेंटमध्ये जिम, गेम रूम, स्विमिंग पूल यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. या अलिशान कॉम्प्लेक्समधून सुंदर अरबी समुद्राचं दर्शनही होतं.

त्यामुळे सी फेसिंगचा आनंद घरातून घेता येणार आहे. याशिवाय अनेक महागड्या सुविधासुद्धा या कॉम्प्लेक्समध्ये उपलब्ध आहेत.  कॉम्प्लेक्समध्ये एक आउटडोअर फिटनेस जिम, आर्टिफिशियल रॉक क्लाइम्बिंग एरिया आहे. इथे एक स्टार-गेजिंग डेक देखील आहे, जो सेलिब्रिटींचा चिल आउट करण्याचा स्पॉट आहे.

या कॉम्प्लेक्समध्ये राणी मुखर्जी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, मेघना घई पुरी, दिशा पाटनी यांसारख्या सेलब्रिटींनीही घर घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.सध्या टायगरच्या या नव्या घराचीच चर्चा बी-टाऊनमध्ये होताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा तोच परिसर आहे जिथे अनेक बडे सेलिब्रिटी राहतात. या परिसरात आपल घर असणं हे प्रत्येक स्टारचं स्वप्न असतं कारण, मुंबईतला सर्वात महागड्या परिसरपैकी एक अशी याची ओळख आहे.

विशेष म्हणजे या घरात एक अशीही जागा आहे जिथे सर्व सेलिब्रिटी आरामात बसून गप्पा मारू शकतात. दरम्यान, टायगरच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर टायगर श्रॉफ लवकरच ‘गणपत’ सिनेमात दिसणार आहे, ज्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. याशिवाय तो सध्या शूटिंग करत असलेल्या ‘हिरोपंती २’ मध्येही दिसणार आहे.