मित्रांनो!, बॉलीवूड मधील सतत ऍक्टिव्ह आणि चर्चेत राहणारी एक सौंदर्यवती म्हणून आपण करीना कपूर-खान ला ओळखतो. आज दोन मुलांची आई होऊनही तिचे ग्लॅमर पूर्वीसारखेच अबाधित आहे. नेमके काय आहे तिच्या या ग्लॅमरस स्टाईल व सौंदर्याचे रहस्य? जाणून घ्या. एका फॅशन शोदरम्यान करीना कपूरला तिच्या स्टाइल आणि सौंदर्याशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळेस तिनं काही आवडत्या ब्युटी प्रोडक्टची माहिती दिली. तसंच नियमित कोणते मेकअप प्रोडक्ट वापरायला आवडते, हे देखील तिनं सांगितलं.

करीना कपूरच्या सौंदर्याचं सीक्रेट, जाणून घ्या तिचं ब्युटी केअर रूटीन. बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे आपलीही त्वचा सुंदर आणि नितळ असावी, अशी प्रत्येक तरुणीची इच्छा असते. यासाठी बहुतांश जणी आपापल्या आवडत्या अभिनेत्रींची लाइफ-स्टाइल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान फिटनेस, स्टाइल आणि मेकअपच्या बाबतीत करीना कपूरला फॉलो करणाऱ्यांची संख्या भलीमोठी आहे. या लेखाद्वारे आपण करीनाचे ब्युटी सीक्रेट, तिचे मेकअप प्रॉडक्ट आणि घरगुती उपचारांची माहिती जाणून घेणार आहोत.

शूटिंग किंवा एखादा इव्हेंट नसल्यास करीना कपूर आपल्या सौंदर्याची कशी काळजी घेते? याचे उत्तर देताना तिने सांगितले की, शूटिंग किंवा कोणतेही काम नसल्यास ती पायजमा, ट्रॅक्स किंवा जीन्स घालणे पसंत करते. करीना असो किंवा सर्वसामान्य तरुणी; कम्फर्टेबल लुकमध्ये कोणीही सुंदर दिसतं. कारण लुक, हेअर स्टाइल आणि मेकअप केल्यानंतर त्यामध्ये कम्फर्टेबल वाटणं अतिशय आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल असता तेव्हा मेंदू देखील शांत असतो. मेंदू शांत असल्यानंतर हॅपी हॉर्मोन्सचा स्त्राव होण्याची प्रक्रिया जलदगतीने होते. यामुळे तुमची त्वचा शांत, सौम्य आणि अधिक सुंदर होते.

​स्टाइलसोबत कम्फर्टेबल लुकची काळजी घेणारी करीना पायजमा, ट्रॅक्स किंवा जीन्सवर एखादं स्किन फिट टॉप परिधान करण्याऐवजी कम्फर्टेबल टी-शर्ट परिधान करणं पसंत करते. कॉटन, क्रेप फ्रॅबिकपासून तयार केलेले कपडे घालणे आपल्या त्वचेसाठी चांगले असते. साधारणतः असे टी-शर्ट्स स्किन फिटेड नसतात. यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. स्किन पोअर्सद्वारे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात. तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करत आहात, या सर्व गोष्टींचाही तुमच्या सौंदर्यावर प्रभाव होत असतो.

आपल्या एव्हरग्रीन आणि आवडत्या मेकअप प्रॉडक्ट्सबद्दल करीनाने सांगितले की, तिला कोल पेन्सिल, काजळ आणि नॅचरल पिंक लिपस्टिक वापरणं आवडते. पण डेली रुटीनमध्ये तिला मेकअप करणं पसंत नाही. याऐवजी ती स्किन केअर प्रॉडक्टचा उपयोग करते, आपल्या त्वचेची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेते. वर्ष २०२०च्या सुरुवातीस पार पडलेल्या या फॅशन शोदरम्यान करीनाने आपल्या आगामी सिग्नेचर स्टाइलबाबत चाहत्यांना माहिती दिली. यावेळेस तिनं ‘लॅक्मे आयकॉनिक गोल्ड पेन्सिल, काजळ पेन्सिल’ या प्रॉडक्टचा उल्लेख केला होता. तर करीनाच्या रेग्युलर मेकअप किटमध्ये लॅक्मे कोल पेन्सिल, एलिगंट पिंक लिपस्टिक आणि मॉइश्चराइझर या तीन गोष्टी कायम असतात.

रात्री झोपण्यापूर्वी करीना कपूर आपल्या त्वचेची खास पद्धतीने देखभाल करते का? या प्रश्नाचे उत्तर देताना करीनाने म्हटलं की, ‘माझं नाइट रुटीन अतिशय बेसिक आहे. मी दिवसभरात भरपूर पाणी पिते. जेणेकरून माझ्या त्वचेमध्ये ओलावा टिकून राहील. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मी द्रवयुक्त पदार्थांचे अधिक सेवन करते. तसंच नियमित मॉइश्चराइझरचा उपयोग करते’. तुमच्या त्वचेमध्ये नैसर्गिक स्वरुपात मोठ्या प्रमाणात ओलावा असेल तर त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत. तुम्ही देखील नियमित जास्त प्रमाणात पाणी प्या, मॉइश्चराइझर लावा आणि योग्य कपड्यांची निवड करा.

टीप : त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.