बॉलिवुडमधील अनेक सिनेमे येतात जातात, काही वेळा कलाकारांचही असं होतं, पण काही गोष्टी बॉलिवुडमधील अशा असतात ज्या प्रत्येक रसिकप्रेक्षकांच्या मनात कायमच घर करून जातात. तर मुळात अशाच एका गोष्टीची चर्चा आपण आज करणार आहोत. कारण ती गोष्ट आहे ती म्हणजे एका खास अभिनेत्याच्या पत्नीबद्दल. चला तर मग आपण जाणून घेऊयात कोण आहे हा कलाकार आणि त्याची पत्नी? तर मुळात ३ इडियट्स या सिनेमाने अगदी तमाम रसिकप्रेक्षकवर्ग हादरवून सोडला.

या सिनेमातील संवाद, प्रसंग, कथानकातील पात्रे, साऱ्याच गोष्टी अगदी लोकांच्या डोक्यात फिट्ट बसून राहिल्या असा हा सिनेमा होता. या सिनेमातला रॅन्चो अर्थात आमिर तर प्रत्येकाला लक्षात राहतोच त्याखेरीज इतरही खास पात्रे आपल्या लक्षात राहतात. तर हे पात्र म्हणजे चतुर रामलिंगम. अर्थात ओमी वैध यांने हे पात्र निभावलं होतं. आणि नुसतं ते निभावलं नाही तर त्याला पुर्ण न्यायदेखील दिला.

खरतरं ३ इडियट्स या सिनेमाने त्या काळी बॉक्स ऑफिसवर प्रचंड धमाल गाजवली होती. आणि ओमी वैध याने आर माधवन, आमिर खान, करीना, शर्मन जोशी यांच्या तोडीस तोड भुमिका पार पाडली होती. आपल्या विनोदी अभिनयातून ओमीने अनेकांना आपलसं करून टाकलं होतं. ओमीने अनेक सिनेमांमधून आपल्या अभिनयाची वारंवार छाप पाडल्याचीही पहायला मिळते. दिल तो बच्चा है जी, प्लेयर्स, देसी बॉयझ यांसारख्या इतर सिनेमांमधे त्याने भुमिका केल्या आहेत.

शिवाय एक कलाकार म्हणूनचं नाही तर एडिटर आणि निर्देशक म्हणूनही त्याने सिनेसृष्टीत काम केलेलं आहे. मुळात सध्या ओमीबद्दल चर्चा करायचं कारण म्हणजे त्याच्या पत्नीची बरीच चर्चा सोशल मीडियावर रंगल्याची पहायला मिळते आहे. ओमी वैध याची पत्नी अर्थात मिनल ही अगदी सौंदर्याच्या बाबतीत मोहक अभिनेत्री आहे, असं म्हणता येईल.

ओमी वैध याची पत्नी मिनल आणि तो अगदी आनंदात त्यांच आयुष्य घालवत असल्याचे पहायला मिळतात. ते दोघेही अनेकदा एकमेकांसोबत फिरायला गेलेले अथवा इतर कुठे कार्यक्रमाला गेलेलेही पहायला मिळतात. दोघेही एकमेकांना बराच वेळ एकत्र देतात. लग्नानंतर नातं कसं जपावं? खरतरं याची पुरेपूर प्रचिती त्यांना पाहून येते. मिनल पटेल आणि ओमी यांना आज एक मुलगादेखील आहे.

२००९ सालात सिनेसृष्टीत व्यवस्थित स्थायिक झाल्यानंतरच ओमीने मिनलशी लग्न केलं. मिनल ही आज जरी एक हाऊसवाईफ असली तरी जेव्हा केव्हा तिचे फोटो सोशल मीडियावर येतात तेव्हा ती अनेकांच्या चर्चेच्या माध्यमाचा विषय बनते. अर्थात तिचं सौंदर्य तितकचं साजेशही आहेच. मिनल तिच्या पतीच्या प्रत्येक कामावर अगदी समाधानी असते.

ओमी सिनेसृष्टीत आल्यानंतर त्याने अनेक सहाय्यक छोट्यामोठ्या भुमिका साकारल्या आणि ठराविक काळानंतर त्याला चांगल्या प्रकारे भुमिका मिळत गेल्या आणि त्यानेही त्या संधीच सोन केलं. मिनल आपल्या पतीकडून फार मोठ्या किंवा अवाजवी अपेक्षा नाही ठेवत. ती त्याच्यावर कायम विश्वास ठेवत आली आहे.

दोघांच नातं किती फुललेलं आणि बहरलेलं आहे याची जाणीव आपल्याला दोघे सोबत वावरत असताना त्यांच्या हावभावांवरून दिसून येते. ओमी वैध हा टिव्ही माध्यमातून मालिकांमधूनही वारंवार प्रेक्षकांच्या भेटीला आला याखेरीज त्याने खुप साऱ्या जाहिराततीदेखील काम केलेलं पहायला मिळतं. खरतरं ओमीच्या इतर एखाद्या पात्रापेक्षा चतुर रामलिंगमचं पात्र रसिकप्रेक्षकांच्या मनावर कायम अजरामर ठरलं आहे असं म्हणता येईल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!