खरतरं हिंदी सिनेसृष्टी म्हटलं की, तिथे बॉलिवुड अभिनेते आणि इतर काही अभिनेत्रींचे संबंध एकतर बनतात किंवा बरेचसे बिघडतात तरी. आजवर आपल्याला विविध कलाकारांच्या गोष्टींमधून हे पहायला मिळालं आहेच. काही लोकांचे नाते हे अगदी चिरकाळ टिकतातही पण काही लोकांचे संबंध कुठेतरी मोडले जातात किंवा त्यांना आळा बसतो. आणि काहीजण नातं निभावण्याचा गोष्टींना प्राधान्य देत आपलं नातं योग्य वळणावर आणून ठेवतात. ते नंतर लग्नबंधनातही अडकतात. तर आज आपण ज्या अभिनेत्याविषयी आणि त्याच्या आयुष्यातल्या जोडीदाराविषयी चर्चा करणार आहोत. त्याचं नाव म्हणजे, वत्सल सेठ.

या हिंदी अभिनेत्याचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलेलं असेलं. आणि हा अभिनेता खासकरून एका दर्जेदार सिनेमातून फारच प्रसिद्धीत आला होता. तो सिनेमा म्हणजे अर्थातचं “टार्झन द वंडर कार” आणि या चित्रपटाचा हा मुख्य भुमिकेत असलेला अभिनेता होता. हिंदी सिनेसृष्टीत अर्थात बॉलिवुडमधे पदार्पण करताच त्याने रसिकप्रेक्षकांना अगदी आपलसं करून घेतलं. टार्झन वंडर कार या सिनेमानंतर वत्सलने इतरही काही चित्रपट केले. पण पुढे त्याला हवं तसं यश मिळालं नाही.

या अभिनेत्याने काही काळ छोट्या पडद्याचा सहारा घेत तिथेही बऱ्यापैकी अभिनय साकारला. वत्सल सेठ याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर त्याने एका अशा व्यक्तीसोबत लग्न केलं की ती व्यक्ती दिसण्याच्या आणि इतरही बाबतीत काही खासच आहे. तर त्याची जोडीदार नेमकी कोण आहे याबाबत आपण थोडसं जाणून घेऊयात.

एक चांगली नावाजलेली अभिनेत्री असलेली इशिता दत्ता हिच्यासोबत वत्सल विवाहबंधनात अडकलेला पहायला मिळतो आहे. तुम्हाला एका गोष्टीचं खरतरं आश्चर्य वाटेल पण दृश्यम या सिनेमात ज्या अभिनेत्रीने अजय देवगण याच्या मोठ्या मुलीची भुमिका साकारली होती तिच ही अभिनेत्री आहे. आणि विशेष म्हणजे, दृश्यम या सिनेमातूनच तिने हिंदी सिनेसृष्टीत स्वत:च पाऊल ठेवलं.

इशिता दत्ता आणि अभिनेता वत्सल यांच लग्न झालं तेव्हा अनेकांना काही प्रमाणात आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. इशिताने याआधी तेलुगू सिनेसृष्टीतून आपलं काम बखुबीने रसिकप्रेक्षकांच्या समोर मांडलेलं पहायला मिळतं. बॉलिवूडमधील एके काळची प्रसिद्ध अभिनेत्री असलेली तनुश्री दत्ता हिची इशिता ही बहिण आहे.

एक विशेष बाब म्हणजे, इशिता आणि वत्सल यांनी मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्न केलं होतं. या दोघांच्या लग्नात अनेक सेलीब्रेटींनीदेखील हजेरी लावल्याची पहायला मिळाली होती. एक धमाल विनोदी योगायोगाची गोष्टी म्हणालं तर दोघांनीही आपापल्या करियरची सुरूवात अजय देवगण याच्या वत्सलने मुलाच्या तर इशिताने मुलीच्या रूपात केली आहे.

इशिता आजवर तिच्या ग्लॅमरस अदांमुळे अनेकदा चर्चेत राहिल्याची तर पहायला मिळालीच आहे. शिवाय ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बरेच वत्सलसोबतचे तिचे फोटोजही शेअर करत असते. तिचे फोटो अनेकदा चाहत्यांच लक्ष वेधून घेतात. तिच्या सोशल मीडियावरील हालचालींकडे अनेकांच लक्षही लागलेलं असतं. इशिता अभिनयाच्या बाबतीत फारच उत्तम अभिनय करते हे निश्चितपणे पहायला मिळतं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!