बॉलीवुडमधील हॅन्डसम हंक अशी खास ओळख असलेला जॉन अब्राहम. आजच्या घडीला जॉन अब्राहमचे दरवर्षी एकापाठोपाठ एक उत्कृष्ट सिनेमे रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आणि त्याच्या एकूणएक सिनेमांमधे अगदी त्याला शोभेल अशीच त्याच्या पात्रांची निर्मिती केलेली असल्याची अनेकदा पहायला मिळते.

जॉन अब्राहम याची तरूणाईमधे विशेष क्रेझ आधीपासून होती आणि आजही ती कायम आहे. बॉलीवुडमधे आपल्या अभिनयाची दमदार छाप उमटवणाऱ्या जॉनच्या लग्नाला नुकतीच सात वर्ष पुर्ण झाली आहेत. प्रिया रूंचाल हिच्यासोबत जॉनने लग्न केलेलं आहे. 2014 या सालात या दोघांचा विवाह संपन्न झाला.

दोघांनी अगदी सर्वांपासून लपूनछपून हा विवाह केला होता. इतकचं नाही तर जॉनची पत्नी प्रिया आजही लाईमलाईटच्या झगमगाटापासून फार दुर असल्याची पहायला मिळते. जॉन अब्राहमच्या लग्नाला सात वर्ष पुर्ण झाली हीदेखील बाब अनेकांना माहित नव्हती. परंतु प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केल्यानंतर जॉनच्या जवळच्या लोकांनी त्याला शुभेच्छा द्यायला सुरूवात केली. प्रियाने तिचा जॉन अब्राहम याच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला होता. त्या फोटोमधे दोघांचीही केमिस्ट्री अगदी भन्नाट असल्याची पहायला मिळते.

 

मिडियाच्या कॅमेरासमोर सहसा ही जोडी क्वचितच स्पॉट झाल्याची पहायला मिळते. प्रियाला वैयक्तिक पातळीवर सहसा स्पॉटलाईट आणि हा फिल्मी झगमगाट फारसा आवडत नाही. दोघांनी जेव्हा अगदी गुपचुप लग्न केलं होतं, तेव्हादेखील अगदी मोजक्या लोकांनाच त्यांचा विवाह झालेला ठाऊक होतं. जॉन अब्राहम हा जिमचा आणि वर्कआउटचा किती चाहता आहे हे आज सर्वांनाच माहीत आहे. आणि मुंबईत बांद्रा येथील एका जिममधे प्रिया आणि जॉन यांची पहिली भेट झाली. त्यानंतर एनआरआय असलेल्या प्रियाशी अगदी वर्षभराच्या आतचं जॉनने लग्न केलं. प्रिया ही लंडनमधे शिक्षण पुर्ण केलेली आणि लॉस एंजेलिस या ठिकाणी परदेशात वाढेलेली आहे.

 

प्रिया एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहे, याचा खुलासा एकदाच जॉनने एका मुलाखतीदरम्यान केला होता. प्रिया तिच्या आयुष्याला फार खाजगी ठेवणंच अधीक पसंत करते, असंही तो एकदा म्हणाला होता. खरतरं या सर्व गोष्टींव्यतिरिक्त म्हटलं तर प्रिया ही फुटबॉल टीम नॉर्थ ईस्ट युनाइटेड एफ सी या संघालाही सांभाळते. सर्वांना माहितच आहे की, बिपाशा आणि जॉन चक्क नऊ ते दहा वर्षे रिलेशनशीपमधे होते परंतु काही कारणास्तव दोघांच ब्रेक-अप झाल्यानंतर जॉनने आपली वाट प्रियासोबत कायमची पक्की केली. जॉन अब्राहम बऱ्याचदा आपल्या पत्नीला क्वालिटी वेळ देत असताना, तिच्यासोबत फार आनंदात जगत असल्याचा पहायला मिळतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!